करमाळा तालुक्यात आमदार रोहित दादा पवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा
राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे कोविड सेंटर साठी 51 हजार रुपयांचा धनादेश तहसीलदार समीर माने यांच्याकडे सुपूर्द
करमाळा समाचार –

कर्जत जामखेड चे लोकप्रिय आमदार आदरणीय रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व रोहीत दादा पवार विचार मंच करमाळा यांच्या संयुक्त वतीने जेष्ठ नेते सुभाष आबा गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील आशा सेविका, तहसील कर्मचारी, यांना प्रत्येकी सॅनीटायझर बॉटल, मास्क आणि रोपे वाटप करण्यात आले.

यावेळी करमाळा तहसीलदार समीर माने साहेब तसेच पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे साहेब यांना प्राथमिक स्वरूपात सॅनीटायझर, मास्क देण्यात आले तसेच रोहीत दादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन राष्ट्रवादी कॉंग्रेस करमाळा तालुका अध्यक्ष संतोष वारे यांच्या वतीने कोविड सेंटर ला ५१ हजार रूपये चा धनादेश तहसीलदार साहेब यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, युवक तालुकाध्यक्ष आप्पासाहेब आहेरकर, युवक शहराध्यक्ष अभिषेक आव्हाड, महिला नेत्या सविता शिंदे, महिला तालुकाध्यक्षा नलिनी जाधव, महिला शहराध्यक्षा राजेश्री कांबळे, महिला शहर सरचिटणीस साधनाताई खताळ, नंदिनी लुंगारे, तालुका उपाध्यक्ष शरद नेटके, युवक तालुका उपाध्यक्ष तेजेश ढेरे युवक जिल्हा उपाध्यक्ष महेश काळे-पाटील, युवक प्रसिद्धी प्रमुख बंटी फरतडे, युवक तालुका उपाध्यक्ष अजय साबळे, युवक तालुका सरचिटणीस राज केसकर, सचिन नलवडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष विवेक लोहार, विद्यार्थी तालुका उपाध्यक्ष करण सरडे, सुहास पोळ, प्रदीप सरडे, प्रतीक जाधव, विकास गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सेल चे पदाधिकारी व कार्यकर्ते त्या बरोबर रोहीत दादा पवार विचार मंच महाराष्ट्र राज्य करमाळा चे पण सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन रोहीत दादा पवार विचार मंच महाराष्ट्र राज्य करमाळा तालुका व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी करमाळा यांनी मिळुन केले होते