करमाळासोलापूर जिल्हा

उपोषणाच्या सहाव्या दिवशी रिटेवाडी प्रकरण चिघळले ; दोघांना दवाखान्यात हलवले

करमाळा समाचार 

सरपंच दादासाहेब कोकरे यांच्या नेतृत्वखाली रिटेवाडी ग्रामस्थांच्या उपोषणाचा आजचा ६ व दिवस उजडला तरी वेगवेगळ्या आश्वासनानंतर आजही काम सुरु झाले नाही. पण आता उपोषणकर्त्यापैकी दोघांची तब्बेत बिघडली आहे. दोघांनाही कुटीर रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

काल सोमवारी उपजिल्हाधिकारी चव्हाण मॅडम यांनी करमाळा येथे येऊन काम सुरु करण्याबाबत आश्वासन दिले व आदेश दिले त्यानंतर अधिकाऱ्यांनी काम तर सुरु करणे लांबच आपले संपर्क क्रमांकही बंद ठेवले आहेत. तर आता परिस्थिती बिघडली असुन आंदोलन कर्त्यांचे प्रमुख रिटेवाडीचे सरपंच दादासाहेब कोकरे यांचीव त्यांचासोबत धुळा भाऊ कोकरे यांची प्रकृती खराब झाली आहे. त्यांची तपासणी करुन दोघांनाही जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

काल उपजिल्हाधिकारी चव्हाण मॅडम यांनी रिटेवाडी गावात तसेच उपोषण स्थळी भेट देऊन कामाचे आदेश देऊन देखील पुरनवसन चे मुजोर प्रशासन व कंत्राटदार यांनी अजूनदेखील रस्त्याचे काम चालू केले नाही. आता पुढचा निर्णय रस्ता रोको करण्याचा आहे. तरीही नाही झाले तर आत्मदहन नक्कीच करु.
– ऱिटेवाडी ग्रामस्थ,

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE