आई खाऊ घालेना , बाप भीक मागु देईना अशी गत .. परवानगी द्या अन्यथा रस्त्यावर उतरु – मनसे तालुकाध्यक्ष घोलप
करमाळा समाचार
लॉकडाऊन मुळे वाजंत्री व बॅंड पथकाचे कंबरडे मोडले आहे. काम करण्याची इच्छा असताना कोरोनामुळे घालुन दिलेल्या नियमामुळे काम करु शकत नाही. तर आता कलाकारांचे वय जास्त असल्याने दुसरीकडेही कामाला जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांची अवस्था आता आई खाऊ घालेना आणी बाप भिक मागु देईना अशी अवस्था झाली आहे त्यामुळे सहानुभूतीपुर्वक विचार करावा अन्यथा बॅंड चालकांच्या हितासाठी रस्त्यावर उतरु असा इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका व शहर च्या वतीने करमाळा तहसीलदार यांना करमाळा तालुका व शहरातील पारंपारीक वाद्य (बॅन्ड) वाजवण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून निवेदन देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधी व न्याय प्रदेश सरचिटणीस अॅड.किशोर शिंदे, मनसे तालुकाध्यक्ष संजय घोलप, शहराध्यक्ष नानासाहेब मोरे, मनसे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील, जनहित मनसे प्रदेश उपाध्यक्ष नंदकिशोर खरसडे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सतिश फंड, विद्यार्थी शहराध्यक्ष सचिन कणसे, मनसे शहरउपाध्यक्ष रोहीत फुटाणे, अमोल जांभळे यांच्यासह करमाळा तालुक्यातील बॅन्ड व्यावसायिक व कलाकार मनसे सैनिक उपस्थित होते.