कोरोनाची ग्रामीण मध्ये घुसखोरी कोर्टी नंतर कामोणेत बाधीत वाढले
प्रतिनिधी – करमाळा समाचार
अनेक दिवसानंतर पुन्हा एकदा करमाळा तालुक्यात कोरोना ने घुसखोरी करण्यास सुरुवात केली आहे. काल-परवापर्यंत क्वचित ठिकाणी आढळणारे रुग्ण आता मात्र दुहेरी संख्येने आढळून लागले आहेत.

त्यामध्ये काल कोर्टी येथे एकाच वेळी ही अधिक बाधीत रुग्ण सापडल्यानंतर आता कोरानी आपला मोर्चा कामोणे कडे वळवला आहे. काल कोर्टीत 14 तर आज कामोणेत नवे सात रुग्ण आढळल्याने ग्रामीण भागात कोरोना पुन्हा एकदा पाय पसरू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. आज तब्बल 283 टेस्टमध्ये 14 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये शहरात तीन तर ग्रामीण भागात अकरा नवे रुग्ण आहेत.

आजचे एकुण टेस्ट – 283
शहर –
टेस्ट – 11
बाधीत – 3 .( 1 पु 2 म )
फंड गल्ली 2. ( 1 पु 1 म )
सावंत गल्ली 1 पु
ग्रामीण –
टेस्ट – 272
बाधीत – 11 (9 पु 2 म )
जेऊर 1 .(.1पु. )
कामोणे 7 (. 5 पु 2 म )
वरकुटे. 1 पु
शेलगाव 1 पु
पारेवाडी 1 पु
आज सोडले- 03
उपचार – 91
एकुण सोडले 2174
एकुण रुग्ण 2295