करमाळासोलापूर जिल्हा

पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने काम करा – पवार ; माजी आमदार नारायण पाटील गटातील शिवसैनिकांची पहिल्यांदाच सक्रिय सहभाग

प्रतिनिधी सुनिल भोसले

राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस आय सर्व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करून पुणे पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदार संघ यातून महा विकास आघाडीचे उमेदवार निवडून द्यावेत असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले करमाळा येथे या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयवंतराव जगताप उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावर आमदार संजय मामा शिंदे शिवसेनेचे, उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, बारामती ॲग्रो चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.आज प्रथमच महाविकास आघाडीच्या प्रचारात शिवसेनेचे महेश चिवटे, तालुकाप्रमुख सुधाकर लावंड, शहर प्रमुख प्रवीण कटारिया सह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित असल्याचे दिसून आले.

यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. या भ्रमात भाजपचे नेते मंडळी आहेत. त्यांचा भ्रमाचा भोपळा फोडून सर्व पदवीधर व शिक्षकांचे प्रश्न सोडवणार या उमेदवारांना निवडून द्या.

यावेळी बोलताना संजय मामा शिंदे म्हणाले की विकासाचे राजकारण करत असताना सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न आहे आपसातले गट मतभेद विसरून पक्षीय वाद विसरून सर्वांनी एकजुटीने काम करावे.

यावेळी बोलताना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले, आम्हाला उद्धव साहेब ठाकरे यांचा आदेश महत्त्वाचा असून आम्हाला आमच्यापेक्षा प्रमुखांनी महा विकास आघाडीचे तन-मन-धनाने काम करावे असे आदेश दिले आहेत, त्यामुळे तालुक्यातील पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आम्ही सर्व शिवसैनिक तन-मन-धनाने आजपासून यामहा विकास आघाडीच्या प्रचारात सहभागी झालो आहोत. शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता आपल्याजवळील प्रत्येक मत विकास आघाडी ला देणार यात कुठलीही शंका नाही असा विश्वास दिला.

यावेळी बोलताना जयवंतराव जगताप म्हणाले की, राजकारणाचा प्रवाहात काही गोष्टी घडत असतात मी काही काळ शरद पवारांच्या विचारापासून दूर गेलो होतो पण माझे पवार कुटुंब या वरचे प्रेम कधीच कमी झालेले नाही मी स्पष्ट बोलतो यामुळे माझे फार राजकीय नुकसान झाले आहे. तरीसुद्धा मी प्रामाणिकपणा कधीही सोडलेला नाही या निवडणुकीत सुद्धा आम्ही तन-मन-धनाने महा विकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहोत.

यावेळी कार्यक्रमाच्या आरंभी देशभक्त कै. नामदेवराव जगताप यांच्या प्रतिमेचे पूजा करून 26/11च्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना व शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी युसूफ सेख,सर्जेराव खरात, सविता शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्तविक विक्रम साळवे यांनी ,सूत्र संचालन प्रा.भागडे दत्तात्रय यांनी केले तर आभार सचिन अब्दुले सर यांनी मानले.

यावेळी जि.प. चे माजी उपाध्यक्ष सुभाष गुळवे,राजेंद्रसिह राजेभोसले, जि.प. सदस्य उद्धव दादा माळी, मकाई कारखान्याचे संस्थापक आप्पासाहेब झाजूर्णे, वामनराव बदे,प.स. सदस्य रोहिदास सातव, बाजार समिती संचालक दादासाहेब मोरे, आण्णासो पवार,माजी उपनगराध्यक्ष प्रशांत ढाळे,मानसिग खंडागळे, अॅड अजिनाथ शिंदे, उपनगराध्यक्षअहमद कुरेशी, प. स. सदस्य नागनाथ लकडे, जि.प. सदस्य संतोष वारे,दत्तात्रय अडसूळ, बाजार समिती संचालक मयूर दोशी, शिवसेनेचे महेश चिवटे, सुधाकर काका लावंड,प्रवीण कटारिया, प्रा. जयप्रकाशबिले , काँग्रेस चे तालुका अध्यक्ष दादासाहेब लबडे, राष्ट्रवादी चे प्रा. गोवर्धन चवरे, शिवराज जगताप, हनुमंत मांढरे पाटील, अभिषेक आव्हाड,आश्पाक जमादार, डॉ. अमोल दुरंदे,राष्ट्रवादी काँग्रेस च्या अॅड.सविताताई शिंदे,विजयमाला चवरे, सौ. नलिनीताई जाधव, सौ.लुंगारे, तृप्ती साखरे, सौ. कांबळे, मकाईचे माजी संचालकविवेक येवले,तानाजी झोळ, सुजीत बागल, भोजराज सुरवसे, जनार्दन नलवडे,नसरूल्ला खान, रामदास गुंडगीरे, नवले, सर्व नगरसेवक सर्व व्यापारी, पत्रकार,तसेच महाविकासआघाडी चे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी, तालुक्यातिल पदवीधर व शिक्षक मतदार ,मोठया संख्येने उपस्थिती होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE