करमाळासोलापूर जिल्हा

२६ नोव्हेंबर संविधान गौरव दिनानिमित्त कोविड योध्दांचा सन्मान ; पत्रकार आरोग्य कर्मचाऱ्यांसह सामाजीक कार्यकर्त्यांचा समावेश

प्रतिनिधी सुनिल भोसले 


दि.२६.नोव्हेंबर२०२० संविधान गौरव दिन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पंचशील व संविधानाचे वाचन करून शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या वतीने संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने करमाळा तालुक्यातील कोरोना महामारीस आळा घालणाऱ्या कोविड योंध्दाचा संविधान घटना व भारताचे संविधान प्रत तसेच कोविड सेवा योध्दा सन्मानपत्र देऊन शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करून मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी करमाळा तहसिलदार समीरजी माने व नगरपरिषदचे मुख्याधिकारी वीणा पवार, पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांचे प्रतिनिधी करमाळा पोलिस स्टेशनचे ए पी आय भुजबळ, सहाय्यक निबंधक तिजोरे, पोलिस पाटील संघटनेचे संदिप शिंदे, ग्रामसेवक संघटनेचे ननवरे भाऊसाहेब, पत्रकार पुढारी अश्पाक सय्यद, दिव्यमराठी विशाल घोलप, जयंत कोष्टी, जनसत्य करमाळा समाचार सुनिल भोसले , शितलकुमार मोठे, पुण्यनगरी अलीम शेख, सिध्दार्थ वाघमारे, सुराज्य सचिन जव्हेरी, अविनाश जोशी तसेच होमगार्ड मधील तालुका सिमेवर काम करणारे कर्मचारी, आरोग्य अधिकारी व कर्मचारी तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, नगरपालिकेचे कर्मचारी सफाई कामगार, कोविड सेंटर मध्ये काम करणारे सफाई कामगार व कर्मचारी, आशा वर्कर तसेच आरोग्य सेविका या सर्वांना कोविड सेवा योध्दा सन्मानपत्र देऊन सन्मानित करून गौरविण्यात आले.

कार्यक्रम प्रसंगी बोलताना तहसीलदार समीरजी माने व नगरपरिषदचे मुख्याधिकारी वीणा पवार मॅडम म्हणाले, कोविड योंध्दा फक्त आम्ही नसुन ज्या लोकांनी फिल्डवर काम‌ प्रत्येक घटकांपर्यंत पोहचुन काम केले ते सुद्धा कोविड योंध्दा आहेत. काम करणे हे आमचे कर्तव्य आहे. आमची यंत्रणा सक्षमपणे काम करत असताना त्यांच्यावरही वेगवेगळे आरोप झाले होते. तरी आजुनही आपण सावध राहिले पाहिजे. कोरोना गेलेला नाही. दुसरी लाट येणार हे निश्चित आहे. यामध्ये आमचे आरोग्य कर्मचारी सफाई कामगार व तहसील मधील पोलिस पाटील संघटना, ग्रामसेवक संघटना, तलाठी संघटना यांनी चांगले काम केले पत्रकार बांधवानी ही चांगले सहकार्य केले, आता येणाऱ्या दुसऱ्या लाटेचा आपल्याला सामना करावा लागेल. त्यासाठी तोंडावर मास्क वापरणे, सिनिटायजरचा वापर करणे, सोशल डिस्टन्स पाळणे, विनाकारण बाहेर न पडणे इत्यादी दक्षता घेणे गरजेचे आहे.

शेवटी शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे बोलताना म्हणाले, प्रशासनाने व त्यांच्या टिमने आपल्या जिवावर उदार होऊन कुटुंबाचा विचार न करता जनतेसाठी प्रमाणिकपणे अहोरात्र कोरोनाशी सामना केला म्हणुनच बाकी जिल्ह्याच्या तुलनेत पाहिलं तर आपली कोरोना बाधीताची सख्या व मृत्यूची संख्या  कमी आहे. यामध्ये पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी तहसीलदार समीरजी माने, मुख्याधिकारी वीणा पवार यांनी योग्य नियोजन प्रशासनातील यंत्रना सक्षमपणे राबवली. त्यामुळे करमाळा तालुक्यात जास्त प्रमाणात शिरकाव झाला नाही. यावेळी शेतकरी कामगार संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजक अॅड महादेव कांबळे , ऍड अनिल कांबळे, प्रशांत कांबळे गौतम कांबळे, महाराज कांबळे, सावताहारी कांबळे, आप्पा भोसले, अनिल तेली, आण्णा सुपनवर , सुनिल खारे यांनी कार्यक्रम यशस्वी केला.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE