जिल्हा परिषद सदस्या सविताराजे यांच्या पाठपुराव्याला यश ; पालकमंत्र्यांनी दाखवला हिरवा कंदील
दिलीप दंगाणे – जिंती प्रतिनिधी
सवितादेवी राजेभोसले यांच्या मागणीला यश आले आहे.
पालकमंत्री भरणे मामांनी सोलापूर जिल्हा हद्द डिकसळ पुल ते डिकसळ गाव (इंदापूर तालुका) 2 किमी रस्त्याचे डांबरीकरण व्हावे म्हणून दोन कोटी रू मंजूर केले आहेत अशी माहीती दिली. बऱ्याच दिवसापासून रखडलेल्या रस्त्याची दुरुस्तीची मागणी मागील अनेक वर्षापासून परिसरातील नेते मंडळी तसेच जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले करत होत्या.

करमाळा तालुक्यातील 20ते 25 गावचा पुणे जिल्ह्याशी रोजचा संपर्क आहे. या कामाची आग्रही मागणी व पाठपुरावा जिल्हा परिषदेच्या सदस्या सवितादेवी राजेभोसले यांच्या प्रयत्नातून होत असताना डिकसळ पुलापुढील म्हणजेच पुणे जिल्हा हद्द 2 किमी रस्ता डांबरीकरण व्हावे म्हणजेच आपल्या करमाळा तालुक्यातील पश्चिम भाग व पुणे जिल्हा वाहतूक व्यवस्था जलद गतीने होऊन विकासाला चालना मिळेल म्हणून आपल्या अधिकारात संबंधित खात्याला पञव्यवहार करून हे काम मंजूर करून घ्यावे म्हणून सदरील निवेदन दिले होते. तर त्याचा पाठपुरावा ही त्या करीत होत्या.

जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले ,सरपंच संग्रामराजे भोसले वाल्मिक वाघमोडे शाम ओंभासे आदि ग्रामस्थांनी पालकमंञी करमाळा दौरावर असताना जिंती येथे वीज प्रश्नाबाबत निवेदन दिले. त्यावेळी मामांनी 2 कोटी रूपये मंजूरी दिली आहे. दोन दिवसात निवीदा बाहेर येईल असे सांगितले.