करमाळासोलापूर जिल्हा

कामगारांचे 56 महिन्याच्या पगारी शिल्लक साखर विक्रीतुन प्रति क्विंटल तीनशे रुपये कपात करुन पगार द्यावा – दशरथ आण्णा कांबळे

 प्रतिनिधी सुनिल भोसले

शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे यांनी आदिनाथ कारखान्यातील कामगार वाहनधारक शेतकरी यांचा व्यव्हार 15 दिवसाच्या आत कारखान्याने मिटवावा अन्यथा रक्त सांडो आंदोलन करण्याचा इशारा सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन ई-मेल ने कळविण्यात आले आहे.

पुढे निवेदनामध्ये म्हटले आहे, आदिनाथ सहकारी साखर कारखानातील शेतकरी कामगार यांच्या ऊस बिले थकित पगारी गेल्या दोन वर्षापासून शेतकर्यांच्या थकित एफ आर पी साठी प्रति टन 90 रुपये प्रमाणे अंदाजे अडीच कोटी, +(25000000) थकित असून जिल्हाधिकारी यांच्या, आदेशानुसार ऊस बीलासाठी कारखान्याचे साखर गोडाऊन नंबर 4सिल केले असे समजते. तरी सदरच्या साखरेचा लिलाव करून विक्रीतून येणारी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. कारखान्यात काम करणाऱ्या 583 कामगारांचे 56 महिन्याचे पगार थकीत असून सोलापूर सहकार न्यायालयात शिल्लक साखर विक्रीतून पगार द्यावा व कारखाना पंधरा दिवसात सुरू करून 1 /9/20 20पासून सर्व कामगारांना कामावर पूर्ववत रुजू करून त्यांच्या नियमित पगार देण्यात यावा.

तसेच शिल्लक साखर विक्रीतून प्रती क्किटल तीनशे रुपये प्रमाणे कपात करून थकित पगारासाठी त्या पैशाचा कामगारांना मोबदला द्याव असा न्यायालयाचा आदेश असताना कारखान्याने एक सप्टेंबर पासून फक्त एक महिन्याचा पगार व 10हजार अॅडव्हान्स रक्कम पगार पोटी दिली आहे. तीन लाख 32 हजार सहाशे पाच साखर साठ्यापैकी 1 /9/2020 ते 30/ 11/ 2020 अखेर 69 हजार 335 किंटल साखर विक्री झालेली असून विक्री केलेल्या साखर पोत्याचे पगारा पोटी तीनशे रुपये प्रति पोते दोन कोटी दहा लाख रुपये कारखान्याकडे जमा झाले. सप्टेंबरचा 72 लाख पगार 10000 हजार अॅडव्हान्स प्रत्येकी त्याचे साठ लाख असे एकूण एक कोटी 32 लाख होतात. मग 78 लाख शिल्लक पगाराचे पैसे कुठे आहेत. त्याच पैशातून कामगारांचा एक पगार देण्याचे आदेश व्हावेत. कामगारांचा अंदाजे 36 महिन्याचा प्रायव्हेट फंड पीएफ थकीत असून पीएफच्या अधिकाऱ्यांनी कारखाना स्थळावर येऊन पीएफ वसुलीसाठी कारखान्याचे साखर गोडाऊन नंबर 2 सील जप्त केले असून सदर जप्त साखरेचा पंधरा दिवसात लिलाव करून विक्रीतून येणाऱ्या रखमा कामगारांच्या खात्यावर जमा कराव्यात. सदर पीएफची रक्कम 6 कोटी आहे श्री मकाई कारखान्याच्या कामगारांचा 32 लाखाचा थकित पीएफ साठी चेअरमन कार्यकारी संचालक यांच्यावर कार्यालयाने अफरातफरीचा गुन्हा दाखल केला आहे. आदिनाथ कारखाना सुद्धा मकाई कारखान्यातील चेअरमनच्या व्यक्तींच्या कुटुंबातील व्यक्तींच्या नेतृत्वाखाली कार्यरत असून सह्याचे अधिकार असलेल्या आदिनाथच्या चेअरमन संचालक कार्यकारी संचालक यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा. गेल्या दोन वर्षापासून ऊस तोडणी वाहतूक कमिशन कामगारांच्या नावावर कारखान्यांचे उचललेले कर्ज सदर कर्जाची रक्कम अनेक कोटीच्या मध्ये आहे वाहन मालकाच्या व कामगारांच्या व्यक्तिगत सातबारा उतारावर सदर बँकांनी बोजा चढवला असून वाहन मालक कामगार वैफल्यग्रस्त झालेले आसुन याचाही निर्णय व्हावा.

श्री आदिनाथच्या बेजबाबदार पणामुळे संचालक मंडळाच्या कारभारामुळे राज्य बँकेने एम एस सी कारखाना 120 कोटी साठी जप्त केला असून कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी टेंडर नोटीस काढली आहे. तरी कारखाना भाड्याने देण्या अगोदर कारखान्याकडून येणे असणाऱ्या शेतकरी कामगार वाहन मालक यांच्या थकीत रकमेचा व्यवहार 15 दिवसाच्या आत पूर्ण करावा किंवा त्याची जबाबदारी घ्यावी अन्यथा आम्हाला कारखान्यातील बँकेच्या भाडेकरू व्यापाऱ्यांच्या व पर्यायाने शासनाच्या विरुद्ध रक्त सांडू आंदोलन करण्यात येईल असे माहितीसाठी महाराष्ट्र राज्य राज्यपाल, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री, आयुक्त भविष्य निर्वाह निधी उपशास्त्रीय कार्यालय सोलापूर , तहसीलदार करमाळा , पोलिस निरीक्षक करमाळा, कार्यकारी संचालक आदिनाथ सह साखर कारखाना यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या असून शेवटी निवेदनामध्ये म्हटले आहे आमच्या सर्व मागण्या मान्य न केल्यास शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या स्टाईने रक्त सांडो आंदोलन करण्यात येईल अशा इशारा दशरथआण्णा कांबळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE