जिल्ह्यात सर्वाधीक पहिली उचल देणाऱा पहिला कारखाना म्हणुन रयतच्या वतीने चेअरमनचा सन्मान
करमाळा समाचार
आज मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल साहेब यांनी चालू गळीत हंगामातील ऊसाची पहिली उचल 2200 रूपये शेतकर्यांच्या खात्यात जमा करून जिल्ह्यातील ह्या हगांमात सर्वात जास्त पहिली उचल देऊन शेतकर्यांना दिलासा दिला आहे.
कारण गेली आठ ते दहा महिने झाले शेतकरी कोरोणाच्या महामारीने कोलमडला होता दुसर्या बाजूला मोठ्या प्रमाणात अतिव्रष्टीने शेतकर्याची सर्व पिके वाहून गेली शेतात सडून गेली त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता त्यांना बाहेर काढण्यासाठी मकाई चे अध्यक्ष यांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यांना मोठा दिलासा देऊन 2200 खात्यामध्ये जमा केल्याने त्यांचा रयत क्रांती संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
त्यावेळी दिपक भोसले रयत क्रांती संघटना महाराष्ट्र कार्याध्यक्ष अजय बागल रयत क्रांती संघटना प्रदेश कार्यकारणी सदस्य , एम डी खाटमोडे साहेब इतर शेतकरी इत्यादी.