E-Paperकरमाळासोलापूर जिल्हा

महावितरणने केलेल्या सहकार्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा ; मनसेने केला अधिकाऱ्यांचा सत्कार

करमाळा समाचार 

बिबट्या ने करमाळ्यात काही दिवसापुर्वी तीन शेतकर्याचा जीव घेऊन दहशत निर्माण केली होती, त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना,करमाळा तालुकाच्या वतीने शेती पंपासाठी लागणारी संध्याकाळची वीज दिवसासाठी महावितरण ने करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, करमाळा तालुका व शहर च्या वतीने केली होती.

त्याची तत्काळ दखल घेत करमाळ्यातील महावितरण आधिकारी यांनी शेतकर्याच्या हितासाठी तत्काळ दिवसा वीज सोडली त्यावेळी शेतकर्यानी समाधान व्यक्त केले त्यामुळे मनसे तालुका अध्यक्ष संजय (बापु) घोलप, शहरअध्यक्ष नानासाहेब मोरे, म.न.वि.से चे सचिन कणसे यांच्या हस्ते श्री. सुमित जाधव साहेब उपकार्यकारी अभियंता , करमाळा उपविभाग, श्री. रघुनाथ शिंदे साहेब सहायक अभियंता. करमाळा शहर शाखा. श्री. सुनिल पवार साहेब कनिष्ठ अभियंता करमाळा ग्रामीण 2 शाखा, श्री. कार्तिक वाघमारे साहेब कनिष्ठ अभियंता करमाळा ग्रामीण 1 शाखा महावितरण अधिकार्यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी जि.उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, ता. उपाध्यक्ष अशोक गोफणे, म.न.वि.से.चे विजय रोकडे, सतिश फंड,आनंद मोरे,रोहित फुटाणे, अमोल,जांभळे, विजय हजारे, अजय माने,व मनसे सैनिक उपस्थित होते.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE