खडकीत भरदिवसा चार ठिकाणी घरफोडी ; शेतकरी शेतात काम करीत असताना घडला प्रकार
करमाळा समाचार
शेतीत कामास गेल्यानंतर खडकी ता. करमाळा येथे भर दिवसा चार घरांमध्ये चोरी झाल्याचे घटना घडली आहे. यामध्ये भिसे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या एकट्याचेच ७५ हजारांचे चोरी झाली आहे. तर इतर तिघांच्या घरातही चोरांनी दि १२ ला दुपारी एकच्या दरम्यान डल्ला मारला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, विठठल मारूती भिसे वय 45 वर्षे धंदा-शेती, रा. खडकी (सूळ वस्ती) ता.करमाळा जिसोलापूर हे सकाळी 11/00 वाचे सुमारास पत्नी, मुले असे घरापासुन मागे थोडया अंतरावर असणा-या शेतात कांदे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी घरी नेहमी प्रमाणे कुलुप लावुन व्यवस्थीत बंद केले होते. मुलगा अशोक हा घरी दुपारी 01:00 वाचे सुमारास शेळीला गवत टाकून परत शेतात आला व नंतर पुन्हा जेवण आणण्यासाठी दुपारी 01:30 वाचे सुमारास गेला व लागलीच तो परत आला.

त्यास का आला अशी विचारणा केली असता त्याने सांगीतले की, आपले व शेजारील काका भाउ यांचे घरांची कुलूपे कोणीतरी तोडली असुन घराचे दरवाजे उघडेच आहेत व घरातील सामान अस्ताव्यास्त पडलेले आहे. त्यामुळ तात्काळ राहते घरी जाऊन पाहिले व घराची पाहणी केली असता त्यावेळी भिसे व त्यांच्या भावाचे राहते घराचे दरवाजाचे कुलूप व कोंयडा कोणीतरी तोडलेला दिसला. यावेळी पत्र्याच्या पेटी मध्ये ठेवलेले किंमती सामान तसेच ज्वारी व तुरीचे पिकाचे पटटीचे आलेले 65,000/- रु. रोख नेले होते.
चोरीस गेले मालाचे वर्णन खालीलप्रमाणे.
1) 4500/- रू एक सोन्याची 1.5 ग्रम वजनाची नाकातील नथ
2) 3000/- रू सोन्याचेदोन मणी एकूण 1 ग्रम वजनाचे
3) 3000/- रू एक सोन्याची फन्सी बुगडी 0.970 ग्रम वजनाची
4) 218/- रू एक सोन्याची मणी मंचली 0.070 ग्रम वजनाची
5) 65,000/- रू रोख रक्कम रूपये
असे एकुण 75,718/- रूयेणे प्रमाणे वरील वर्णनाचा व किंमतीचा माल व रोख रक्कम हे कोणीतरी अज्ञात चोरटयाने राहते बंद घराचे कुलुप कोयंडा तोडुन घरात प्रवेश करून संमतीशिवाय प्रवेश करून मुददम लबाडीने चोरून नेले आहे. तसेच घराशेजारी राहणारा भाउ भाउसाहेब मारूती भिसे व गावातील भाउसाहेब श्रीधर मोरे, भिमराव महादेव शिंदे यांचेही घरी चोरी झाल्याचे मला समजले आहे.