करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा नगरपरिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर ; विविध स्पर्धांचे आयोजन

प्रतिनिधी सुनिल भोसले


करमाळा नगरपरिषदेतर्फे स्वच्छ सर्वेक्ष्ण 2021 व माझी वसुंधरा अभियान या अंर्तगत मा.नगराध्यक्ष वैभवराजे जगताप तसेच वीणा पवार, मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा, झिंगल/गीत स्पर्धा, किचन गार्डन व होम मेड कंपोस्ट स्पर्धा यांचे आयेाजन करण्यात आले होते. यामध्ये माझी वसुंधरा व पंचत्तत्वांचे महत्त्व, मानवी हव्यासामुळे पर्यावरणाची झालेली हानी व उपाय, स्वच्छतेचे महत्तव घरगुती कचरा व्यवस्थापन इ.विषयावर आधारित चित्रकला स्पर्धा करमाळा नगरपषिद जुनी इमारत, पुणा रोड येथे पार पडल्या.

सदर स्पर्धमध्ये 1 ली ते 4 थी लहान गटांमध्ये प्रथम क्रंमांक सर्वेश्वर गलांडे, व्दितीय क्रमांक आयुष पानसंडे, तृतीय क्रमांक अक्षदा संजय घोलप तसेच उत्तेजनार्थ विभागुन अलंकृत धुमाळ, हरिष पाटील, स्वरा उकिरडे यांनी पटकवला. 5 वी ते 8 वी या गटामध्ये प्रथम क्रमांक नंदिनी पाटील, व्दितीय क्रमांक श्रध्दा आढाव, तृतीय क्रमांक निशा देवकर तसेच उत्तेजनार्थ विभागून, श्रुती क्षीरसागर, सलोनी जाधव यांनी पटकवला. चित्रकला मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक दिग्विजय शिंदे, व्दितीय क्रमांक लतिका धुमाळ, तृतीय क्रमांक मनाली गलांडे उत्तेजनार्थ आम्रपाली कांबळे, वैशाली लुंगारे, अथर्व काटुळे, सानिका चांदगुडे यांना देणेत आला.

चित्रकला स्पर्धेचे परिक्षण श्री.नितीन विठ्ठल विधाते व श्री रफिक खलील खान यांच्याकडून करणेत आले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE