E-Paperकरमाळामाढासोलापूर जिल्हा

प्रमाणापेक्षा जादा वाहतुक करणाऱ्या सात गाड्यांवर आरटीओची कारवाई ; तीन लाखांचा दंड वसुल

करमाळा समाचार – सुनिल भोसले 

तालुक्यात आज विविध ठिकाणी छापा मारी करून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सात गाड्यांवर ज्यादा ओझे लादल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली. यामध्ये तब्बल तीन लाख दहा हजार रुपयांचा दंड एका दिवसात वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांनी बुधवारी धडक मोहीम राबवत टेंभुर्णी रोड तसेच विट, जेऊर, कोर्टी या भागात सात माल ट्रक वर कारवाई केली. यामध्ये वेगवेगळ्या गाडीत खडी, पशुखाद्य, दगड अशा प्रकारची वाहतूक केली जात होती. संबंधित विभागाचे मोटार वाहन निरीक्षक संदीप मुरकुटे, अश्विन पोंदकुले व वाहन चालक संतोष मखरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

यामध्ये वाहन क्रमांक एम एच ४६ ए आर ४८७१ ही गाडी कुंभेज ते कोर्टी रस्त्यावर प्रमाणापेक्षा जास्त माल घेऊन जाताना आढळून आली. यावेळी ताब्यात घेऊन ७६ हजार ५०० रुपये दंड आकरण्यात आला. तसेच टेंभुर्णी रस्त्यावर एम एच १३ ए एक्स २५०५ अधिक माल नेल्यामुळे ४४ हजार ५०० दंड वसुल केला आहे. टेंभुर्णी रस्त्यावर दुसरी गाडी क्रमांक एम एच २१ – ९३८१ या माल ट्रकला ३७ हजार ५०० दंड आकारला, टेंभुर्णी रस्त्यावर तीसरी गाडी क्रमांक एम एच ४२ बी ९५०९ याला १० हजार २०० दंड आकारला आहे. टेंभुर्णी रस्त्यावर चौथी गाडी क्रमांक एम एच १४ डी एम ७८९१ गाडीला ५५ हजार ५०० दंड आकारला आहे. टेंभुर्णी रस्त्यावर पाचवी गाडी क्रमांक एम एच १३ ए एक्स ४०८९ याच्या मालकास १५ हजार दंड, तर जेउर येथे गाडी क्रमांक एम एच १२ क्यु ए ९६२७ या गाडीवर ७० हजार ८०० दंड आकारला आहे असा एकुण दंड तीन लाख दहा हजार वसुल करण्यात आला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE