करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

माल वाहतुक करणारा ट्रक चौकात अडकला ; तासभर वाहतुकीचा खोळंबा

करमाळा समाचार

मालवाहतूक करणारा ट्रक चालक गावात घुसल्याने जवळपास तासभर वाहतूक खोळंबली होती. बराच वेळ ट्रक चौकातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात होते. मुख्य बाजारपेठेत सदरचा ट्रक दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास जातोच कसा ? हा मोठा प्रश्न आहे. शहरातील वाहतुकीचा खोळंबा त्यामुळे होणार आहे. याची काळजी कशीच कोणी घेत नाही हा मोठा प्रश्न आहे. नगरपरिषद व पोलीस ठाणे यांनी या प्रकाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

करमाळा शहरातील मेन रोड,भाजी मंडई, राशिन पेठ व जय महाराष्ट्र चौक या ठिकाणी वाहनांची कायम वर्दळ असते. प्रमुख दुकाने, दवाखाने याच परिसरात असल्यामुळे ग्राहकही या परिसरात गर्दी करून असतात. पण चार चाकी वाहने या परिसरात ये जा करतात. त्यामुळे वाहतूक अडचण होऊन बसते. कार गाडी रस्त्यावरून येजा करणे हे साहजिक आहे. परंतु मोठी वाहने जे मालवाहतूक करतात अशी वाहने गावात आली तर काय अवस्था होईल याची प्रचिती नुकतीच करमाळा वासियांना आली.

त्यामुळे अशा वाहनांना गावात प्रवेश किती वाजता द्यावा व माल उतरवण्याची वेळ दुकान मालकांना किती वाजता असावी याकडे लक्ष वेधणारे हे प्रकरण आहे. जर कायद्याची भीती कोणाला राहिली नसेल तर आताही यावर कारवाई होणार नाही. पण जर लोकांना या अडचणीतून बाहेर काढायचे असेल तर प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE