हाताने उकरला जातोय नवा रस्ता ? ; रस्त्याच्या कामावर तक्रारींचा पाऊस
करमाळा समाचार
वाशिंबे ते राजुरी हा रस्ता प्रधानमंत्री सडक योजनेतून मंजूर करण्यात आला आहे. पाच किलोमीटरच्या कामासाठी साडे तीन कोटी रुपये मंजूर करण्यात आलेला आहे. सध्या या रस्त्याचे काम सुरू असून या रस्त्याचे काम निकृष्ट केले जात असल्याची तक्रार राजुरी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. सदरचे निवेदन राजेंद्र भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे.


रस्त्याची डांबरीकरण करण्यात आलेल्या आहे परंतु डांबरीकरण निकृष्ट दर्जाक्गे करण्यात आले आहे. डांबरीकरण झाल्यानंतर लगेच हे डांबरीकरण जागोजागी उचकटलेले आहे. याबाबत ग्रामस्थांनी तक्रार केली असता या तक्रारीची कोणतीही दखल संबंधित विभागाच्या अधिकारी व ठेकेदार यांनी घेतली नाही. उलटपक्षी तक्रार करणाऱ्याला दम दटी करण्यात येत आहे. या रस्त्याचे काम एस्टिमेट नुसार होत नाही मुरमीकरण करणे, पाणी मारणे, रोलिंग करणे अशा पद्धतीने काम व्यवस्थित रित्या झालेल्या नाही. शिवाय डांबरीकरण करत असताना टाकण्यात आलेले डांबर ऑइल मिश्रीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रस्त्यावर केलेले डांबरीकरण वर उचललेल्या दिसून येत आहे.
या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक होणार असून या राज्याचे काम इस्टीमेट नुसार दर्जेदार करण्यात यावे. तात्काळ या अर्जाची दखल घेऊन संबंधित ठेकेदार व अधिकारी यांना आदेश द्यावेत अशी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. अन्यथा वाशिंबे वर आधारित ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.