करमाळासोलापूर जिल्हा

लिंब गोळा केली नाहीतर खराब होतील म्हणुन गेली ती माघारी आलीच नाही

प्रतिनिधी सुनिल भोसले


करमाळा येथील अंजनडोह गावातील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जयश्री शिंदे यांच्या पतीला भेटण्यासाठी नारायण आबा पाटील गेल्यानंतर त्याला रडू आवरले नाही. त्याने घाई मोकलुन रडत आपल्या भावनांना वाट करून दिली. हुंदके देऊन सतत पाच मिनिटात असल्यामुळे उपस्थितांचे मन हेलावून गेले. मयत जयश्री ला दोन लहान मुली व एक मुलगा असून ही तीनही मुले सात वर्षापेक्षा लहान आहेत. मोकलून रडत सांगताना तो म्हणाला की, मी म्हणत होतो जाऊ नको पण ती म्हणाली अर्ध्या तासात आले लिंब गोळा केली नाही. तर वाया जातील असे सांगतील लिंब गोळ्या करण्यासाठी घराच्या पाठीमागे असलेल्या निंबोणीच्या बागेत गेली अर्धा तास झाला तरी ती आली नाही म्हणून मी तिला पाहण्यासाठी निंबोणीच्या बागेत गेलो असता फक्त तिचं मुंडके दिसेल आणि माझं आभाळ फाटल असं सांगत तो रडत होता.

यावेळी आमदार नारायण पाटील यांनी त्याला धीर देत प्रसंगाला तोंड देण्याचे हिम्मत ठेवा असे सांगत त्याला धीर दिला. यावेळी नारायण पाटील यांनी उमरड वीट मांजरगाव वंजारवाडी या भागात जाऊन शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन सर्वांना सुरक्षित राहण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही करमाळा शिवसेनेच्यावतीने ईमेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले असून तातडीने बिबट्या असलेल्या क्षेत्रात ड्रोन कॅमेरा उडवून त्याचा तपास करावा. त्याच पद्धतीने करमाळा तालुक्यात किती गावे आहेत याचीही अधिकृत माहिती गोळा करण्यासाठी यंत्रणा लावावी व तात्काळ या बिबट्याला जेरबंद करणे किंवा गोळ्या घालण्यासाठी आदेश निर्गमित करावे अशी मागणी केली आहे. या निवेदनावर माजी आमदार नारायण पाटील, महेश चिवटे , देवानंद बागल, सभापती गहिनीनाथ ननवरे, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, पैलवान आतुल पाटील, युवा सेनेचे अध्यक्ष विशाल गायकवाड, महिला अध्यक्ष प्रियंका गायकवाड याच्या स्वाक्षर्‍या आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE