करमाळासोलापूर जिल्हा

मकाई निवडणुकीत आक्षेप घेतलेल्या अर्जावर सुनावणी सुरु ; राजेभोसले व झोळ यांच्या सह कार्यकर्ते सोलापूरात

करमाळा समाचार

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रणसंग्रामात आज दाद मागण्यासाठी विरोधी गटातील प्रमुख नेते जिल्हा परिषद सदस्य सवितादेवी राजेभोसले व दत्तकला शिक्षण संस्थेचे रामदास झोळ हे सोलापूर येथे पोहोचले असून सुनावणी सुरू आहे.

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये तब्बल 75 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील 36 अर्ज हे अपात्र ठरवण्यात आले होते. त्यामध्ये राजेभोसले व झोळ यांच्यासह मातब्बर उमेदवारांचा अर्ज हा बाद झाला होता. त्यामुळे सर्वांनी मिळून दाद मागण्याचे ठरवले होते. त्यानुसार छाननीच्या तीन दिवसाच्या आत त्यातील 21 अर्जांवर तक्रारी करण्यात आल्या. त्यावर आज सुनावणी सुरू आहे.

सदरची सुनावणी ही प्रादेशिक सहसंचालक सोलापूर येथे सुरू असून श्री राजेंद्र कुमार दराडे हे काम पाहत आहेत. तर राजेभोसले यांच्या वतीने बाजू मांडण्यासाठी ॲड. मंदर्गी, ॲड. घोडके, ॲड. साळुंखे हे काम पाहत आहेत. आज यावर सुनावणी होऊन निकाल येतोय का याकडे लक्ष लागून राहिले आहे. तक्रार दाखल केल्यानंतर दहा दिवसात निकाल म्हणजेच आता सुनावणीनंतर सात दिवसांच्या कालावधीमध्ये निकाल येणे अपेक्षित असल्याने निकाल आजच लागेल का नाही याबाबत नक्की सांगता येत नसले तरी सुनावणी सध्या सुरू असून सर्व प्रमुख पदाधिकारी व उमेदवार त्या ठिकाणी उपस्थित आहेत.

उमेदवारी अर्ज अपात्र ठरवल्यामध्ये माया झोळ, प्रवीण बाबर, माया झोळ, रामदास झोळ, माया झोळ, अशोक जाधव, प्रविण बाबर, सुधीर साळुंखे, अश्विनी फाळके, अश्विनी फाळके, गणेश कांबळे, तानाजी देशमुख, मारुती बोबडे, आण्णासाहेब देवकर, संतोष वाळुंजकर, भगवान डोंबाळे, सवितादेवी राजेभोसले, विशाल शिंदे , नंदकुमार पाटील, विशाल शिंदे, अंकुश भानवसे, कमल पाटील, कैलास कोकरे असे एकुण २१ अर्ज तक्रारीत गेले आहेत यावर सुनावणी सुरु आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE