खुन प्रकरणात नवा ट्विस्ट , महिले संदर्भात खुलासा व पोलिसांची योग्य दिशेचे कारण आले समोर
करमाळा समाचार –
अहमदनगर टेंभुर्णी महामार्गावर मांगी रस्त्यावर आयटीआय शेजारी रस्त्यापासुन शंभर ते २०० फुट आत मध्ये एक स्विफ्ट गाडीत खुन करुन जाळल्याचा प्रयत्न केलेल्या मृत व्यक्तीची ओळख पटताच अवघ्या बारा तासात आरोपींचा शोध घेण्यात करमाळा पोलिसांना यश आले आहे. सदरचा खुन हा अनैतीक संबधातुन झाला आहे तर यामध्ये संबंधित महिलेच्या मुलांनी व एका महिलेने संगनमताने खुन केल्याचा संशय आहे. यातील दोन संशयीताला अटक करण्यास पोलिसाना यश आले आहे. विशेष म्हणजे काल पर्यत तिसरा आरोपी हा सुन असल्याचे जाहीर केले होते पण सुन नसुन तिऱ्हाईत महिला असल्याचे उघड झाले आहे. आता गुन्हा पुर्ण प्रकारे उघड झाला आहे.

श्रावण रघुनाथ चव्हाण वय ४० रा. अडसुरेगाव ता. येवला जिल्हा नाशीक. असे मृत युवकाचे नाव आहे. तर सुनिल घाडगे व त्याचा भाऊ राहुल व वैशाली यांच्यावर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहीती अशी की, श्रावण हा चालक असुन तो कायमच घराबाहेर राहणे गावी जाणे हे सुरु असायचे. पण यावेळी तो दि ३ तारखेला दुपारी घरातुन गेला. त्यानंतर त्याचा फोन बंद लागु लागला. त्यामुळे त्याचा शोध घेतला मिळुन आला नाही. अखेर तो मिसिंग असल्याबाबत येवला पोलिसात नोंद करण्यात आली. तर त्याचे ज्या ठिकाणी अनैतिक संबंध होते तिथे जाऊन चौकशी केली असता त्या घरातील मंडळीही काल वाद झाल्यानंतर गावी गेल्याचे कळले.
दरम्यान श्रावण याचा मृतदेह करमाळा मांगी रस्त्यावर एका शेतात (एम एच १५ सीटी ८००६ ) यागाडीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळुन आला. सदरचे प्रकरण दि ५ रोजी सायंकाळी सहा पुर्वी उघडकीस आले. त्यानंतर पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे, सहाय्यक पोलिस निरिक्षक एम एन जगदाळे यांनी वेगात यंत्रणा फिरवली रात्रीत नातेवाईक बोलवले. सकाळी सहा पर्यत प्रकरण सगळे उघडे पडले.
यावेळी कळले की श्रावणचा खुन करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी संशयीत लोकांना शोधण्यास सुरुवात केली. दि ६ रोजी सुनिल घाडगे व राहुल हे संशयीत मिळुन आले आहे. सदरची कामगिरी उपविभागीय अधिकारी अजित पाटील , पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक मिठु जगदाळे, सागर कुंजीर, पोलीस नाईक चंद्रकांत ढवळे, अजित उबाळे, पोलीस कॉन्स्टेबल तोफिक काझी, पोलीस कॉन्स्टेबल अमोल जगताप, पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिंदे यांनी केले आहे.
१०० नंबर वर झालेला कॉल महत्वाचा … यामुळे लागला सुगावा ..
ज्या गाडीत मारले त्याच गाडीत जाळण्याचा प्रयत्न केला पण आग लाऊन संबंधित गाडीही जळेल म्हणून निघुन गेले पण मृत शरीर अर्धवटच जळाले व गाडी आतुन सोडली तर बाहेरुन काय झाले नव्हते. त्यामुळे ओळख पटवणे सोपे झाले. त्यानंतर मिसिंग ची नोंद व मयताला गावातुन गाडीत जबरदस्तीने बसवण्याचा सुरु असलेला प्रयत्न व त्यावेळी उपस्थितामधील एकाने १०० नंबरला कॉल केल्याचीही नोंद त्यावरुन हे तिघे असल्याचा संशय आला. त्यानंतर तपास घेतला त्यापैकी एक गावीच मिळुन आला आहे.