करमाळासोलापूर जिल्हा

फोटो लक्षविचलीत करु शकतो – रेल्वे अपघातात अनोळखीचा मृत्यु ; ओळखीचा असल्यास संपर्क साधा

करमाळा समाचार

सोगाव पश्चिम तालुका करमाळा जिल्हा सोलापूर शिवारात वाशिंबे ते पोफळज रेल्वे स्टेशन मध्ये रेल्वे रुळावर रेल्वेची धडक लागून गंभीर जखमी होऊ मृत झाला आहे. सदरचे अनोळखी व्यक्तीचे मृत शरीर दि 10 रोजी मिळून आले आहे.

तरी सदरचे शरीर ओळख पटवण्यासाठी अडचणी येत असून मिळालेल्या माहितीवरून ते कोणाचे ओळखीचे असल्यास करमाळा पोलिसांची संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांनी केले आहे.

वाशिंबे ते पोपळज रेल्वे रूळावर रेल्वेची धडक लागून मयत अवस्थेत व्यक्ती 10 एप्रिल रोजी मिळली आहे. सदरच्या व्यक्तीचे वय अंदाजे 58 वर्ष असून मजबूत बांधा आहे, तर उंची 177 सेंटीमीटर, सावळ्या वर्ण असून डोक्यास बारीक केस, राखाडी रंगाचा गोल गळ्याचा टी-शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट अशा वर्णनाचे मृत शरीर मिळून आले आहे.

तरी सदर ओळखीच्या माहितीची ओळख पटवण्यासाठी अगर तिचे नातेवाईकाची माहिती असल्यास करमाळा येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE