गोवंश घेऊन जाताना एक पिकअप तरुणांनी पकडली ; दोन जण ताब्यात
करमाळा समाचार
अकलूजहुन परंडा कडे जनावर भरून एक पिकअप गाडी घेऊन जात असताना केम येथे कंदरच्या योद्धा गृप च्या युवकांनी सदर गाडीला पकडले. यावेळी गाडीत जवळपास 40 ते 50 गोवंश असल्याचे दिसून आले आहे. त्यातील काही मयतही झाल्याचा संशय आहे. त्यांचे तोंड बांधल्याने श्वास घेताना आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या संशय असून त्यांना करमाळा पोलीस ठाण्यात घेऊन आले आहेत. त्यांच्यावर पुढील कार्यवाही सुरू आहे.

Mh 11 ch 8673 या क्रमांकाच्या पिकअप मधून जनावरे प्रमाणापेक्षा जास्त भरण्यात आली होती. त्यांना परंडा च्या दिशेने घेऊन जात असताना दुपारी पकडण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर हे करीत आहेत.

तर केम येथील युवक व करमाळा शहरातील भाजपाचे कार्यकर्ते पोलीस ठाणे परिसरात जमा झाले आहेत. त्यामध्ये शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, भाजप नेते अमरजीत साळुंखे, वंद मातरम शक्तीसेनेचे सुहास घोलप यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी संबंधितावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.