जेऊरात दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची लढाई ; पाटलांच्या विरोधा उमेदवार कोण ?
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात सर्वांचे लक्ष लागुन राहिलेल्या जेऊर ग्रामपंचायत मध्ये माजी आमदार नारायण पाटील यांच्या मुलाच्या विरोधात नेमके कोण उभे राहणार याबाबत चर्चाना उधान आले आहे. संजयमामा शिंदे गटाकडुन कडवा विरोध केला जात असुन जेऊर ची लढाई दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची लढाई झाली आहे. यात पाटलांच्या विरोधात पाटील का स्थानीक उमेदवार राहिल यावरुन बैठकांचे सत्र सुरु आहे.

तालुक्यातील 16 ग्रामपंचायतचे लढत रंगतदार अवस्थेत आले असून वेगवेगळ्या ग्रामपंचायत मधून तुल्यबळ नेते व उमेदवार समोर येत आहेत. बऱ्याच ठिकाणी एकतर्फी लढती होताना दिसणार तर काही ठिकाणी मात्र हा संघर्ष पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये तालुक्यातील मोठ्या असलेल्या ग्रामपंचायती रावगाव, वीट, जेऊर यासारख्या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तर कावळवाडीत नव्याने संजयमामा शिंदे यांचा पॅनल उभा राहत आहे.

जेऊर या ठिकाणी माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील यांनी संपूर्ण पॅनेलसह उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर त्यांच्या विरोधात संजय मामा शिंदे गटाचे संग्राम पाटील, नितीन खटके, राकेश पाटील आदिनी अर्ज भरले आहेत तर बाळासाहेब कर्चे आज अर्ज दाखल करतील अशी शक्यता आहे. त्यामुळे यातील माघार कोण घेणार आणि पाटलांच्या विरोधात कोण उभे राहणार याकडे लक्ष राहणार आहे.
माजी आमदार नारायण पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील यांच्या विरोधात लव्हे येथील सरपंच विलास पाटील यांचे चिरंजीव संग्राम पाटील हे उभे राहतील का ? ते उभे राहिल्यास पाटील विरुद्ध पाटील अशी लढत पाहायला मिळेल. पण सध्या स्थानिक उमेदवार उभा करण्यावर जोर असल्याने यात बदल होऊन पुन्हा एकदा खटके, कर्चे किंवा पाटील यांच्यापैकी एक उमेदवार पुढे येऊ शकतो अशी शक्यता आहे.