E-Paperकरमाळाराजकीयसोलापूर जिल्हासोलापूर शहर

२०१४ मध्ये एकाच नावाचा तोटा ; २०२४ मध्ये पुन्हा तोच पॅटर्न निकाला नंतर चित्र होणार स्पष्ट

करमाळा समाचार 

करमाळा तालुक्याच्या निवडणुकीत पुन्हा एकदा २०१४ चा पॅटर्न घडण्याची शक्यता दिसून येत आहे. तत्कालीन उमेदवार संजयमामा शिंदे यांची तालुक्यातील पहिली निवडणूक असतानाही एकसारख्या नावाची तीन उमेदवार उभा राहिले होते. तोच पॅटर्न यंदा होताना दिसत आहे. यंदाही तीन उमेदवार एकाच नावाचे असल्याने पुन्हा एकदा संजयमामा शिंदे यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर नेमकी परिस्थिती उमेदवारी निकाला दिवशी दिसुन येणार आहे.

करमाळा विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा चौरंगी लढत होत आहे. राष्ट्रवादी शप गटाकडून माजी आमदार नारायण पाटील, शिंदे गट शिवसेनेकडून दिग्विजय बागल, अपक्ष म्हणून आमदार संजयमामा शिंदे तर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवत असलेले प्रा. रामदास झोळ हे मैदानात आहेत.

politics

तालुक्याच्या राजकारणात यापूर्वी २०१४ मध्ये पहिल्यांदाच करमाळ्याची निवडणूक लढवत असलेले संजयमामा शिंदे यांच्या विरोधात तालुक्यातील दिग्गज मैदानात उतरले होते. त्यासह शिंदे यांच्या नावासारखे साम्य असलेले उमेदवार ही मैदानात आले होते. त्या तीनही उमेदवाराचा फटका संजयमामा शिंदे यांना बसल्याचा दिसून आला होता. या तीन उमेदवारांनी २८१४ मते मिळवली. तर निवडून आलेल्या प्रमुख उमेदवाराला ६० हजार ६७४ मते मिळाली होती. संजयमामा शिंदे यांच्यासह तिघांची ही बेरीज या विजयी आकड्याच्या ५१७ मतांनी पुढे जात असल्याचे दिसून आले होते. तर त्यावेळीच्या निवडणुकीत नारायण पाटील हे रश्मी बागल यांच्यासोबत काट्याची टक्कर देत २५७ मतांनी विजयी झाले होते.

२०१४ च्या निवडणुकीमध्ये…
संजय विठ्ठल शिंदे ५८,३७७, संजय महादेव शिंदे २०००, संजय नामदेव शिंदे ५५२, संजय लिंबराज शिंदे २६२ असे चार उमेदवार मैदानात होते. या सर्वांची बेरीज एकूण ६१ हजार १९१ अशी होत होती. तर नारायण पाटील ६०हजार ६७४ व रश्मी बागल ६० हजार ४१४ असे मत मिळवून पहिल्या व दुसऱ्या स्थानावर होते. तर दोघातील केवळ २५७ मतांचे अंतर राहिले होते. यावेळी संजय शिंदे नावाच्या सर्वांची मते विजयी उमेदवारापेक्षा ५१७ मतांनी अधिक असल्याचे दिसून आले. हा पॅटर्न २०१९ च्या निवडणुकीत दिसला नव्हता. पण पुन्हा २०२४ च्या निवडणुकीत चार संजय शिंदे उभारल्याचे दिसून येत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE