करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

अल्पसंख्याक समाजातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्न सोडविण्यासाठी निवेदन

करमाळा समाचार

आमदार  नारायण आबा पाटील यांना करमाळा मतदारसंघातील अल्पसंख्याक समाजातील शहर व ग्रामीण भागातील विविध प्रश्नाकडे लक्ष वेधून ते सोडविण्यासाठी आपल्या आमदार निधीतून विविध कामांना निधी उपलब्ध करून अल्पसंख्याक समाजातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्न सोडविण्यासाठी भेट घेतली व प्रलंबित कामांची यादी देऊन या वर्षीच्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून किंवा आमदार निधीतून निधी देण्यात यावे अशी मागणी भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळा व सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी मा. आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले की मी अल्पसंख्याक समाजातील शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध प्रश्नाकडे लक्ष देऊन ते प्रामुख्याने सोडविणार आहे. ग्रामीण भागातील ज्या गावात कब्रस्तानात दफनभूमीसाठी जागा उपलब्ध नाही अशा गावांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार आहे. तसेच कब्रस्तान करिता ऑल कंपाऊंड व इतर भौतिक सुविधा, सुशोभीकरण करण्यासाठी निधी देणार आहे, हजरत चाॅंद वली पाशा दर्गा आवाटी शरीफ यांना अ वर्ग दर्जा या प्रयत्न करणार आहे व भक्त निवास आणि इतर सुविधासाठी निधी देणार आहे.

politics

करमाळा शहरातील ईदगाह मैदान सुशोभीकरण करण्यासाठी, कै नामदेवराव जगताप उर्दू शाळा सुसज्ज अशी शालेय इमारती करिता, मदरसा फैजुल कुराण नालबंद नगर या मदरसा मधील विद्यार्थ्यांन करिता वसतिगृह, मुस्लीम समाज करिता सांस्कृतिक भवन शादी खाना, अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी एम पी एस सी व पोलीस भरती करिता अभ्यासिका, करमाळा उप जिल्हा रुग्णालयात 20 बेडचे डायलिसिस सेंटर सुविधा उपलब्ध करणे, असे अनेक प्रश्न अल्पसंख्याक मंत्रालयाच्या माध्यमातून सोडविण्याचे ठोस आश्वासन दिले आहे.

यावेळी हाजी लियाकत भाई शेख, जमीर सय्यद, , समीर शेख, रमजान बेग , सुरज शेख, इकबाल शेख इम्तियाज पठाण, मुस्तकीम पठाण, जहाँगीर शेख, सोयल पठाण व ग्रामीण भागातील विविध गावांतील मुस्लीम समाजातील नागरिक उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE