मांगी परिसरात वडगाव – पुनवर रस्त्यावरील धोकादायक पुलावरील अपघातात ऊस तोड कामगाराचा जागीच मृत्यू
करमाळा समाचार – संजय साखरे
मांगी कडून मोटार सायकल वरती पूनवरकडे निघालेल्या ऊसतोड कामगाराचा रस्त्यावर पुलाचा अंदाज न आल्यामुळे मोटर सायकल सहित त्या पुलावरुन खाली पडल्यामुळे डोक्याला जबर मार लागून जागीच मृत्यू झाला व पाठीमागील बसलेल्या एक जणाला गंभीर दुखापत झालेली आहे , हा अपघात आज शनिवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी रात्री सात वाजता झालेला आहे.

घटनास्थळी पोलीस दाखल होऊन पुढील अधिक तपास करत आहेत. तसेच जखमीला ॲम्बुलन्स मध्ये तत्काळ हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार सदर व्यक्ती मध्यप्रदेश येथून ऊस टोळी सोबत आलेले असल्याचे कळते गावातील स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती कळताच तात्काळ जखमीला मदत केली.
मांगी येथून वडगाव पुनवर ला जाणाऱ्या रस्त्यावर
तलावाचा डावा कॅनॉल तेथून जातो. यावरती छोटासा पूल बांधण्यात आलेला आहे. परंतु त्या पुलावरती कठडे किंवा संरक्षक भिंत नाही तसेच मांगी कडून वडगाव कडे जाताना रस्त्याला पुलालगतच वळण आहे. त्यामुळे यापूर्वीही या पुलावरती बरेचसे अपघात होऊन लोक जखमी झालेले आहेत. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन किमान संरक्षक कठडे किंवा संरक्षक पाईप तरी लावण्याची गरज आहे.
