अभिनंदनाचे डिजिटल बोर्डची मोडतोड ; कारवाईची मागणी
करमाळा समाचार
जेऊर तालुका करमाळा येथे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या समर्थकांच्या वतीने अभिनंदनाचे डिजिटल ठिकठिकाणी लावण्यात आले होते. त्या डिजिटलची अनोळखी व्यक्तींनी फाडाफाडी केली असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी महेश चिवटे यांनी केली आहे.

जेऊर ग्रामस्थ असे या डिजिटल फलकावर शुभेच्छुक म्हणून टाकण्यात आले होते. तर सदरच्या डिजिटल बोर्डवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जेऊर बस स्थानकासाठी दोन कोटी रुपये निधी मिळवून दिल्याबद्दल जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचे अभिनंदन करण्यात आले होते. तसेच कोणार्क एक्सप्रेस जेऊर या ठिकाणी थांबा मिळवून दिल्याबद्दल खासदार नाईक निंबाळकर यांचाही अभिनंदन करण्यात आले होते.

सदरचा प्रकार घडल्यानंतर महेश चिवटे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांनी करमाळा पोलीस ठाण्यात संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
प्रतिक्रिया…
जेऊर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या अभिनंदन करण्यासाठी लावलेला डिजिटल बोर्ड समाजकंटकांनी फाडला आहे. आपल्या देशात लोकशाही असून प्रत्येकाला प्रत्येकाचा विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे असे असताना
मुख्यमंत्र्याचा बोर्ड फाडणे हे निषेधार्ह आहे. यातील दोषींवर कडक कारवाई करावी व आरोपीला अटक करावी.
– महेश चिवटे, शिवसेना जिल्हाप्रमुख सोलापूर.