करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

विश्वराज हॉस्पिटल – लोणी काळभोर आणि स्पंदन क्लिनिक व डे केअर सेंटर यांच्यावतीने केत्तूर येथे मोफत सुपर स्पेशलिटी आरोग्य शिबिर

करमाळा समाचार -संजय साखरे


विश्वराज हॉस्पिटल – लोणी काळभोर
डॉ. पी .बी मनेरी स्पंदन क्लिनिक व डे केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी केतुर 2 येथे मोफत सुपर स्पेशालिटी आरोग्य शिबिर आयोजित केले असून त्याचा परिसरातील सर्व गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आव्हान स्पंदन क्लिनिकचे प्रमुख डॉक्टर पी .बी .मनेरी यांनी केले आहे.

या आरोग्य शिबिरात पुणे येथील विश्वराज हॉस्पिटल मधील नामवंत अस्थिरोगतज्ञ डॉक्टर प्रमोद कुमार सुर्वे व पोटविकार तज्ञ डॉक्टर अनिकेत झरकर यांच्या सह त्यांची संपूर्ण टीम सहभागी होणार आहे .या शिबिरात स्पाइन सर्जरी, जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी, मस्कुलो स्केयलेटेल फ्रॅकचर्, लहान मुलांमधील ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया यासह अपेंडिक्स शस्त्रक्रिया, व्हेरिकोस वेहन्स, मूळव्याध ,फीसर्स , हर्निया, यकृत, स्वादिपिंड ,पित्ताशयाचे शस्त्रक्रिया या रोगांवर मोफत तपासण्या व उपचार केले जाणार आहेत. याशिवाय ब्लडप्रेशर ,ब्लड शुगर, हिमोग्लोबिन यांची तपासणी केली जाणार आहे. शिबिराची वेळ सकाळी दहा ते पाच अशी आहे.

या शिबिरासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी निलेश जाधव -98 60 65 57 09 व 95 79 0 1 87 09 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE