करमाळा

वंजारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी ओंबासे यांची निवड

करमाळा समाचार – दिलीप दंगाणे 

 

वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी जिंती गावचे सुपुत्र सयाजी राजे केशव ओंबासे यांची 24 /01/ 2021रोजी निवड करण्यात आलेली आहे.

 

सयाजीराजे ओंबासे यांनी सामाजिक तसेच राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील त्यांची काम करण्याची आवड दिसून आली व राज्यातील विविध समस्या सोडविण्यासाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी त्यांना विराजमान केले असून त्यांची निवड 01/01/2021 ते 31 /12/ 2023 या कालावधीसाठी करण्यात आलेली आहे. वंजारी महासंघाचे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख श्री खंडेश्वर मुंडे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिलेले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE