जिल्हा परिषद शाळा मांगी येथे विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रियेला सुरवात
करमाळा समाचार
जिल्हा परिषद शाळा मांगी येथे विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रियेला सुरवात दरवर्षी प्रमाणे 15 जून हे शैक्षणिक वर्षाची सुरवात असते. त्याप्रमाणे आज मांगी येथील शाळेत कर्तव्यदक्ष नूतन केंद्रप्रमुख पोतदार गुरुजी व पोतदार मॅडम यांनी विद्यार्थ्यांचं प्रवेश प्रक्रियेला सुरवात केली
अतिशय शिस्त बद्ध पद्धतीने कोरोना नियमांचे काठेखोर पालन करत सुरवात केली. एका वेळी एका पालक व विद्यर्थयाला शाळेत बोलऊन त्यांच कागदपत्र जमा करून घेतली ,व येणारे विदयार्थ्यांना गुलाब पुष्प व फुगे देऊन त्यांचं स्वागत करण्यात आले. अतिशय शिस्त बद्ध नियोजन केल्यामुळे विदयार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले ,जिल्हा परिषद शाळा मांगी येथे पोतदार दाम्पत्य नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवून शाळेचे नाव उंचावत असतात आणि विदयार्थ्यांना पण या शिक्षकांची विशेष गोडी लागली आहे , गेली 2 वर्ष कोरोना संकटामुळे शैक्षणिक सुरवात प्रत्येक्षात करता येत नाही तरी सुद्धा ऑनलाइन पद्धतीने मुलांना शिकवण्याच काम हे शिक्षक करत आहेत, त्यामुळे मुलांना अभ्यास करण्याची आवड निर्माण होते आहे, कोरोना संकट असताना शिक्षकांनी हे कार्य चालूच ठेवले आहे.
