करमाळाक्राईमसोलापूर जिल्हा

दोन ठिकाणी अपयश आल्यानंतर तीसऱ्या ठिकाणी चोरी करुन चोर पसार ; चोर सीसीटीव्हीत कैद

करमाळा समाचार 

घोलप नगर या शहराच्या मध्यभागी चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच चर्चेत आली होती. त्यावेळी दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न करूनही त्यांना चोरी करण्यात यश आले नव्हते अशा बातम्याही वायरल झाल्या. पण त्याच दिवशी महात्मा गांधीचे सेवानिवृत्त शिक्षक हुनसीमरद यांच्या घरी चोरी झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी आता नागरिक करू लागले आहे.

नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. चोरांनी प्रयत्न करूनही त्या ठिकाणी चोरी करण्यात यश आले नव्हते. पण हुमसीमरद हे गावाला गेले होते. त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला व घरातील मुद्देमाल चोरीस गेला आहे. याप्रकरणी शेजारी राहणारे बबन आरणे यांचा फोन आला की, तुमचे घरात चोरी झाली आहे घरामधील साहित्य अस्थवेस्थ पडले आहे असे सांगितले.

सौजन्य – DSP NEWS

ads

यावेळी पाहिले असता लोखंडी कपाटामध्ये ठेवलेले चांदीचे पुजेचे साहित्य ,सोनेचे बांगडया,चैन नसलेबाबत दिसले. त्यावेळी आमची खात्री झाली की, कोणीतरी अज्ञात चोरटयाने दरवाज्याचा कुलूप तोडुन घरात प्रवेश करून चोरी केली आहे. तसेच आमचे शेजारी राहणारे राजाराम गौतम पाटील यांनी सांगितले की, आमचे घराचे दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला होता. चोरीस गेलेल्या मालामध्ये 15,000 रुपये चांदीचे पुजे साहित्य व 15,000 रूपये सोनेचे बांगडया, चैन असे 30,000 येणेप्रमाणे वरील वर्णनाचे व किमंतीचे, चांदीचे पुजेचे साहित्य ,सोनेचे बांगडया,चैन चोरीस गेले आहे.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE