हिवरवाडी नंतर आता चिखलठाण रस्त्यासाठी ग्रामस्थ आक्रमक ; आत्मदहनाचा इशारा
करमाळा समाचार
चिखलठाण कुगाव या रस्त्याचे काम न चालू झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर आज संपूर्ण गाव बांधकाम विभाग या ठिकाणी उपस्थित राहून अधिकाऱ्यांना यासंदर्भात जाब विचारला. यावेळी बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता के. एम उबाळे यांना सर्वांनी घेराव घातला आहे. तर मागणी मान्य न झाल्यास एक वाजेपर्यंत आत्मदहन करणार असल्याचा इशाराही दिला आहे.

मागील दोन वर्षापासून काम मंजुरी मिळालेले असताना सुरू झाले नाही व अर्धवट स्वरूपात काम राहिले आहे. त्यामुळे ग्रामस्थ व परिसरातील लोकांना त्रास होत आहे. तो त्रासअसाह्य होत असून रस्त्याचा तोडगा न काढल्यास सर्वांनीच या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेतल्याचा दिसून येत आहे. सध्या गावकऱ्यांसोबत अधिकाऱ्यांची बैठक सुरू असून याबाबत लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे.

यावेळी अविनाश सरडे, योगेश सरडे, सचिन गावडे, शंकर बोंद्रे, धनंजय डोंगरे, महादेव कामटे, कैलास बोंद्रे, मन्सुर सय्यद, विजय कोकरे, सागर पोरे, मंगेश बोंद्रे, प्रितम पोरे, शब्बीर सय्यद, अमीर सय्यद, शिवाजी सरडे, समीर सय्यद, अतुल गावडे, कृष्णा सुळ हे उपस्थित आहेत.