कार्यकारी अभियंत्यानंतर उप जिल्हाधिकारी यांनी घेतली रिटेवाडीकरांची भेट ; मॅडमने दिले आदेश तरीही आंदोलन सुरुच
करमाळा समाचार –
रिटेवाडी गावच्या रस्त्यासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांनी उपोषण सोडावे या विनंती साठी उपजिल्हाधिकारी पुनर्वसन विभागाच्या चव्हाण मॅडम या आज करण्यात आल्या होत्या. त्यांनाही गावकऱ्यांनी जोपर्यंत रस्ता सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार असल्याबाबत सांगितल्यावर चव्हाण मॅडम या रिटेवाडी च्या दिशेने गेल्या त्या ठिकाणी पाहणी करून रस्त्याच्या कामाला सुरुवात करा हे उद्या उपोषण सोडतील असे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

रिटेवाडीकर दिनांक एक तारखेपासून उपोषणाला बसलेले असतानाही त्यांच्याकडे गांभीर्याने पाहिले जात नव्हते. तर उद्याच कामाला सुरुवात करतो असे सांगून गेले अधिकारी तीन दिवसानंतर ही तिकडे फिरकले नाहीत म्हणून ग्रामस्थ व अधिकाऱ्यांच्या मधील वातावरण थोडेसे बिघडलेले असताना आज उपजिल्हाधिकारी पुनर्वसन विभागाच्या चव्हाण मॅडम या करमाळा येथे आल्या होत्या. त्यांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात करण्याचे आदेश देऊन सध्या तरी परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. कामाला सुरुवात होऊन दोन ते चार दिवसात बंद पडल्यास पुन्हा एकदा रास्ता रोको हे आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे.
