करमाळासोलापूर जिल्हा

कृषी उत्पन्न बाजार समीती मारहाण प्रकरण ; माजी आमदार जगताप यांच्यासह सात जणांना दिलासा

समाचार टीम – बार्शी

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडी दरम्यान झालेल्या हल्ला प्रकरणात नंतर जगताप यांच्यासह सात जणांवर शासकीय कामकाजात अडथळा व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणात जगताप यांना दिलासा देत बार्शी येथील सत्र न्यायाधीश सी जे जगदाळे यांनी सातही जणांना दोष मुक्त केले आहे.

यामध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप, वैभव जगताप, शंभूराजे जगताप. बबन उर्फ सचिन चांदगुडे, जयराज चिवटे, विकी फंड, शिवराज चिवटे आदींचा समावेश आहे. 3 ऑक्टोंबर 2018 रोजी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवड प्रक्रियेदरम्यान सदर प्रकरण घडले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक लढविण्यापूर्वी माजी आमदार नारायण पाटील व जयवंतराव जगताप यांनी एकत्रित निवडणूक लढवत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सत्तेचा दावा केला होता. पण ऐनवेळी पाटील गटातील शिवाजी बंडगर हे बागलांना जाऊन मिळाले व त्यानंतर बंडगर व दिग्विजय बागल यांना कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात मारहाण झाली होती. यावेळी जखमीने आमच्या पार्टीतुन का गेला असे म्हणून शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. यावेळी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी रिवाल्वर काढून गोळ्या घालून खाल्लास करण्याची धमकी देऊन त्या रिव्हालवरने दिग्विजय बागल यांच्या नाकावर जोरात ठोसा मारून जखमी केले व पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून शासकीय कामकाजाची फिर्याद दाखल करण्यात आली होती.

यावेळी माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यासह सात जणांवर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, घातक हत्याराणे मारणे तसेच सरकारी काम करत असताना व इतर कारणांमुळे गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी पोलिसांनी तपास करून आरोपी विरोधात सदर कलमान्वये बार्शी येथील न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. त्यावरून जगताप यांच्या सह इतरांनी ॲडवोकेट मिलिंद थोबडे यांच्यामार्फत दोषमुक्त करण्याचा अर्ज दाखल केला होता.

यावेळी युक्तिवाद करताना थोबडे म्हणाले, रिवाल्वर नाकावर मारणे म्हणजे जीव ठार मारण्याचा प्रयत्न करणे असे होत नाही. केवळ घातक हत्याराने मारलेले कलम लागू होईल. तसेच दोषारोपपत्राचे अवलोकन केले असता सरकारी कामकाजात अडथळा केल्याचे कलम लागू होत नाही. यावेळी उच्च व सर्वोच्च न्यायालयाची निवाडे सादर केली ते ग्राह्य धरून न्यायाधीशांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व सरकारी कामगार अर्थ आणण्याचे कलमातून आरोग्यांची दोष मुक्तता केली व इतर कलमान्वये चार्ज फ्रेम करण्याची व सदर खटला प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी करमाळा यांच्या समोर चालण्याचा वर्ग करण्याचे आदेश दिले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE