करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

अहमदनगर टेंभुर्णी महामार्गावर झरे फाट्यावर अपघात ; एकाचा मृत्यु

करमाळा समाचार

करमाळा शहरातून आपल्या गावी कुंभेज येथे जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेले कुंभेज येथील रवींद्र शिंदे वय 40 यांचा सोलापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. काल दुपारी बाराच्या सुमारास सदरचा अपघात हा झरे फाटा येथे झाला होता.

रवींद्र सोपान शिंदे करमाळ्याहून कुंभेजच्या दिशेने निघाले होते. यावेळी झरे फाटा येथे पाठिमागुन येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर शिंदे यांना गंभीर जखम होऊन त्या ठिकाणी पडले होते. यावेळी अपघात एवढा जोराचा होता की त्यांची मोटरसायकल काही अंतरावर जाऊन पडली. त्यानंतर परिसरातील लोकांनी त्यांना दवाखान्यात पोहोचवले.

करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना सोलापूर येथे पाठवण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE