करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

राजुरीत सर्वरोग निदान व रक्तदान शिबीर संपन्न ; ३२४ जणांची तपासणी ४२ रक्तदात्यानी दिले योगदान

राजुरीत सर्वरोग निदान व रक्तदान शिबीर संपन्न
करमाळा समाचार – संजय साखरे राजुरी गावचे माजी उपसरपंच स्व. कुंडलिक जयवंत टापरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त टापरे कुटुंबियांच्या वतीने काल रविवार दि, ८ सप्टेंबर रोजी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र राजुरी येथे सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व माजी आमदार नारायण पाटील यांच्या शुभहस्ते झाले.

या शिबिराकरिता प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ.रमेश भोइटे,डॉ भोसले (गिरिराज हॉस्पिटल,बारामती) तसेच नेत्रतज्ञ डॉ हितेश मेहेर, एमडी डॉ. विठ्ठल पवार, बालरोगतज्ञ डॉ उदयसिंह गायकवाड व डॉ अभिजित हंकारे, स्रीरोग तज्ञ डॉ वृशाली हंकारे, त्वचारोग तज्ञ डॉ रोहित साळुंखे, दंतरोगतज्ञ डॉ. प्रियंका दुरंदे, H V देसाई चैरिटेबलट्रस्ट, पुणे, आयुर्वेदिक दवाखाना जिंती, दुरंदे हॉस्पिटल कोर्टी यांचा सहभाग होता.

या शिबिरात हृदयरोग तपासणी, नेत्ररोग तपासणी, स्त्रीरोग तपासणी, बालरोग तपासणी, अस्थिरोग तपासणी, त्वचारोग तपासणी, दंतरोग तपासणी, मुळव्याध तपासणी, तसेच कान नाक घसा तपासणी आयुर्वेद, होमिओपॅथी तज्ञांकडून मोफत तपासणी, सल्ला व उपचार करण्यात आले. याबरोबरच या शिबिरामध्ये हिमोग्लोबिन, शुगर, रक्तदाब, इसीजी, अँजिओग्राफी इ. तपासण्या मोफत करण्यात आल्या. या शिबिरात एकूण ३२४ नागरिकांनी सहभाग नोंदवला. तसेच यावेळी रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ४२ नागरिकांनी रक्तदान केले.

यावेळी करमाळा तालुक्यातील विविध गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने महाआरोग्य शिबिरासाठी उपस्थित होते. हे यावेळी करमाळा तालुक्यातील विविध गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने महाआरोग्य शिबिरासाठी उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सरपंच सोनाली राजेंद्र भोसले, डॉ अमोल दुरंदे, डॉ विद्या दुरंदे, डॉ संकेत फाळके, शिवाजी जाधव, पप्पू टापरे यांनी मोलाचे सहकार्य केले.

politics

प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत गेल्या अनेक वर्षांपासून बांधून धूळ खात पडून आहे. या इमारतीचा नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयोग व्हावा यासाठी या आरोग्य उपकेंद्राच्या ठिकाणी डॉक्टर आणि आरोग्य सेवकांची नेमणूक व्हावी अशी मागणी यावेळी नागरिकांच्या वतीने विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडे करण्यात आली.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE