चिखलठाण गटातील सर्व ऊस गाळप करणार – शिंदे
करमाळा समाचार -संजय साखरे
करमाळा तालुक्यातील पांडे येथील कमलाभवानी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन श्री विक्रम सिंह शिंदे यांनी आज तालुक्यातील चिखलठाण ऊस उत्पादक गटाचा दौरा करून तेथील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

तालुक्यातील चिखलठाण येथील ऊस उत्पादक शेतकरी श्री रामेश्वर गलांडे भाऊसाहेब यांच्या घरी त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेतली. सध्या अतिरिक्त उसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून ऊस जाईल की नाही या चिंतेने त्याला ग्रासले आहे. चिखलठाण गटातील ऊस प्रोग्राम ची सविस्तर माहिती घेऊन त्यांनी कारखान्याकडे नोंद केलेल्या सर्व प्रकारच्या उसाचे गाळप प्रोग्राम प्रमाणे करण्याचे शेतकऱ्यांना आश्वासन दिले.
यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचे तालुका अध्यक्ष रवींद्र ववळेकर, श्रीकांत बारकुंड भाऊसाहेब, तानाजी सरडे, विठ्ठल गव्हाणे, संभाजी रांजुण आदी उपस्थित होते.
