पोथरे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अमोल साळुंके
करमाळा समाचार
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा पोथरे (तालुका करमाळा) शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संतोब साळुंके तर उपाध्यक्षपदी विद्या शिंदे यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीनंतर केंद्रप्रमुख निशांत खारगे, मुख्याध्यापक गजेंद्र गुरव यांनी अभिनंदन केले.

दोन वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन समिती नेमण्यात आली. पहिली ते सातवी प्रत्येक वर्गातील सदस्य घेतल्यानंतर अध्यक्ष पदासाठी सर्व सदस्यांची अध्यक्षपदासाठी चिट्टी टाकण्यात आली. यामध्ये संतोष साळुंके यांची चिट्टी निघाल्याने त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सचिव म्हणून मुख्याध्यापक गजेंद्र गुरव, शिक्षक तज्ञ म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक दादासाहेब झिंजाडे तर सदस्य म्हणून प्रियंका जाधव, रुक्मिणी रंधवे, संध्या जाधव, हरिश्चंद्र नंदरगे, दादा ढावरे, रजनी जाधन, यशवंत शिंदे, सोनाली गोपणे यांची निवड करण्यात आली.

यावेळी सहशिक्षक दत्तात्रय मस्तूद, बापू रोकडे, शगुप्ता हुंडेकरी, शाबीरा मिर्झा, स्वाती गानबोटे, सविता शिरसकर, उपसरपंच दिपाली जाधव, अनिल झिंजाडे, माजी अध्यक्ष बप्पा शिंदे, राज झिंजाडे, अंगद देवकते, राज झिंजाडे, सुरेश शिंदे, सुनिल पाटील, मुकेश जाधव, हरी नंदरगे, विठ्ठल रंदवे, नितिन साळुंके, दादा ढावरे, राजू हिरडे अशोक शिंदे पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.