करमाळाक्राईमताज्या घडामोडीसोलापूर जिल्हासोलापूर शहर

लसणाची वाहतुक करणाऱ्या मालट्रकचा अपघात ; शेतात झाला लसुणच लसुण

करमाळा समाचार

समोरून येत असलेल्या गाडीला चुकवण्याच्या नादात डाव्या बाजूने रस्त्याखाली गेल्याने माळ ट्रकचा अपघात झाला आहे यावेळी रस्त्यात उभा असलेल्या मोटरसायकल सह गाडीमध्ये असलेल्या 17 टन लसुन रस्त्यावर पडला त्याशिवाय माळ ट्रक पूर्ण अस्ताव्यस्त झालेली दिसून आली या अपघातात चालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले आहेत सदरचा अपघात मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास झरे फाटा येथे घडला आहे

या अपघातामध्ये वशंतभई आर आहिर (वय ६०)
रा. राजकोट गुजरात, बटुकभई प्रेमजीभाई ठाकुर (वय ६०) रा. राजकोट गुजरात हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर करमाळा येथे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णालय येथे उपचार चालु आहेत.

राजकोट गुजरात येथून व्यापाऱ्याचा जवळपास १७ टन लसुन घेऊन दोघे जण मालट्रक( क्रमांक जी जे ०३ बी व्ही ३४६३) मधून हुबळी कर्नाटकच्या दिशेने जात होते. सदरची माल ट्रक ही करमाळा टेंभुर्णी महामार्गावर आल्यानंतर झरे फाटा येथे दुपारी चारच्या सुमारास समोरून येणाऱ्या कार गाडीला चुकवण्याच्या प्रयत्नात सदरची गाडी डाव्या बाजूने रस्त्याच्या खाली उतरली. यावेळी बाजूला असलेल्या शेतात जाऊन जोराचा अपघात झाला. यादरम्यान रस्त्यावर उभा असलेल्या मोटरसायकलला धडक दिल्यामुळे मोटरसायकल (क्रमांक एम एच ४५ एके ९६७२) हिचे नुकसान झाले आहे.

याशिवाय माल ट्रक चा संपूर्ण बांधा निखळून पडला आहे. यामुळे त्यामध्ये असलेला संपूर्ण लसुन हा रस्त्यावर पडून नुकसान झाले आहे. सदर घटनेचा रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नव्हती. चालक व क्लिनरवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE