करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

वरकटणे ग्रामस्थांचा आदर्श उपक्रम – “रक्तदान हेच महादान” म्हणत १६० तरुणांचे उस्फूर्त रक्तदान

वरकटणे (ता. करमाळा) :


“दानात मोठं कोणतं, तर ते रक्तदान… आयुष्याची ज्योत विझू न देणारे हेच महादान!” — हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून साकारत वरकटणे गावात अखंड हरिनाम सप्ताह व श्री भैरवनाथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समाप्तीच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमाला पंचक्रोशीतील तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण १६० तरुणांनी रक्तदान केले. या शिबिरासाठी कमला भवानी ब्लड सेंटर, करमाळा यांचे तांत्रिक सहकार्य लाभले. रक्ताचा प्रत्येक थेंब कोणाच्या तरी आयुष्यात नवा प्रकाश पेरणार असल्याची जाणीव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. शिबिरात सहभागी झालेल्या दात्यांचे पुष्पगुच्छ,पाण्याचा जार व प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व विशद केले आणि “आपण दिलेले रक्त कधी, कुठे, कोणाचे प्राण वाचवेल हे आपल्यालाच माहीत नसते; त्यामुळे रक्तदानाची सवय लावून घ्या” असे आवाहन केले.

ads

या सामाजिक उपक्रमासाठी वरकटणे ग्रामस्थांनी एकजुटीने मेहनत घेतली. शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांसह तरुण मंडळींनी नियोजन व कार्यवाहीत विशेष सहभाग नोंदवला.

“रक्तदान केल्याने रक्त कमी होत नाही, उलट समाजात मान वाढतो; म्हणूनच रक्तदान करा आणि जीवनदान द्या” — हा प्रेरणादायी संदेश या शिबिरातून सर्वदूर पोहोचला.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE