करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

वीज पडल्याने देवळालीत वृद्ध तर भाळवणीत गाई ठार

करमाळा

गुरे चारण्यासाठी गेलेल्या तालुक्यातील देवळाली येथील एकावर वीज पडून एकाचा मृत्यू झाला आहे. गुरुवार दि. १७ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली आहे. सदरची घटना देवळाली गुळसडी रस्त्यावर घडली आहे. याबाबत उपस्थीत लोकांनी त्यांना तात्काळ दवाखान्यात नेले डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले. याशिवात भाळवणीतही गाई वर वीज पडल्याची माहीती मिळत आहे.

चांगदेव बाबू कानगुडे (वय-६०) रा. जाधव-कानगुडे वस्ती देवळाली असे मयत वृद्धाचे नाव आहे. ते गुळसडी रस्त्यालगत गुरे चारत होते. त्यानंतर पाऊस आल्याने ते घराकडे फिरले रस्त्यात येत असताना यावेळी कानगुडे यांच्या अंगावर वीज पडली त्यात ते गंभीर जखमी झाले होते. जवळच गुरे चारत असलेल्या इतर गुराख्यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी गावातील युवकांना याबाबत माहिती देऊन रुग्णवाहिकेला बोलवले.

politics

त्यावेळी रुग्णवाहिकेतून त्यांना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मयत कानगुडे यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE