करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

ग्रामपंचायत सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर

करमाळा

करमाळा तालुक्यातील १०८ ग्रामपंचायती मधील आरक्षण सोडत मंगळवारी जाहीर करण्यात आली आहे, यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या उपस्थिती मध्ये आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी अनुसूचित जमातीसाठी केवळ एक जागा असल्याने त्या ठिकाणी पुनवर या ग्रामपंचायतसाठी सोडण्यात आली. यासर्व चिठ्ठ्या चौथीतील पुर्वा चांदगुडे हिच्या हातुन काढण्यात आल्या आहेत. सदरची सोडत ही २०३० पर्यत लागु असेल अशी माहीती देण्यात आली.

अनुसूचित जमाती –
पुनवर

politics

अनुसूचित जमाती (महिला) –
निरंक

अनुसूचित जाती –
घारगांव, उमरड, सौंदे, दहीगाव, शेलगांव (वां), मलवडी

अनुसूचित जाती (महिला) –
शेलगांव (क), फिसरे, वाशिंबे, देवळाली/ खडकेवाडी, साडे, पाथुर्डी

नागरिकांचा मागास प्रवर्ग-
गुलमरवाडी / भगतवाडी, गोयेगाव, रावगाव, चिखलठाण, भाळवणी, देलवडी, राजुरी, रिटेवाडी, मांगी, पोटेगांव, वडाचीवाडी/दिलमेश्वर, गौंडरे, आवाटी, जेऊरवाडी

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)-
बिटरगांव (श्री), पोथरे/निलज, पिंपळवाडी, करंजे/भालेवाडी, झरे, निंभोरे, घोटी, ढोकरी, कोंढारचिंचोली, मोरवड, आळजापूर, पाडळी, कोळगांव, पोफळज, शेटफळ

सर्वसाधारण-
कावळवाडी, भिलारवाडी, कुंभारगाव/धरतवाडी, दिवेगव्हाण, पारेवाडी, जिंती, कात्रज, टाकळी रा., खातगांव, कोर्टी/गोरेवाडी/हुलगेवाडी/ कुस्करवाडी, वंजारवाडी, विहाळ, मांजरगांव, अंजनडोह, खडकी, तरटगांव, बोरगाव, हिवरवाडी, रोशेवाडी, पांडे/खांबेवाडी/धा‌यखिंडी, मिरगव्हाण, हिवरे, अर्जुननगर, सरपडोह, कुंभेज, केडगाव, कुगांव, वांगी नं.१, वांगी नं.4/ भिवरवाडी, वरकुटे, केम, बिटरगांव (वां), सातोली

सर्वसाधारण (महिला)-
रामवाडी, पोमलवाडी, केतूर, सोगांव, सावडी, लिंबेवाडी, विट, पोंधवडी, उंदरगाव, जातेगाव, बाळेवाडी, कामोणे, वडगांव उ. / वडगांव द., भोसे, देवीचामाळ, हिसरे, निमगांव (ह), सालसे, आळसुंदे, नेरले, कोंढेज, वरकटणे, जेऊर, लव्हे, वांगी नं.२, वांगी नं.३, पांगरे, वडशिवणे, कविटगांव, सांगवी, कंदर, हिंगणी, गुळसळी.

यावेळी तालुक्यातील विविध भागातील ग्रामस्थ उपस्थीत होते. तर तहसिलदार शिल्पा ठोकडे, नायब तहसिलदार विजय लोकरे, मंडलाधिकारी राजेंद्र राऊत, संतोष गोसावी व तलाठी विनोद जवणे यांनी काम पाहिले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE