निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर होताच हौश्या नवश्या गवश्यांची संख्या वाढली
समाचार टीम
नुकतंच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे कोणत्या गणात व कोणत्या गटात कोणता उमेदवार उभा राहू शकतो यासाठी चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांचे काम सुरू आहेत. जे कोणत्या ना कोणत्या गटाशी, पक्षाशी एकनिष्ठ राहून कायम समाजसेवा करीत असतात अशा लोकांना राजकारणात संधी मिळतच असते. आपसूकच त्यांना त्यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी प्रोत्साहन देत असतात.

पण सध्या सोशल माध्यम व पोर्टल, youtube चा जमाना आहे. या माध्यमांच्या माध्यमातून कमी वेळेत जास्त लोकांच्या नजरेत येण्यासाठी याचा वापर केला जात आहे. सुरुवातीच्या काळात यामध्ये मोजकेच लोकांचा भरणा असायचा. पोर्टल व युट्युब एखादी माहिती लावून घेण्यासाठी वर्तमानपत्रा इतका त्रास घ्यावा लागत नाही. जाहिरातीच्या माध्यमातून असेल किंवा इतर माध्यमातून उमेदवार आपली माहिती सोशल माध्यमांमध्ये पसरवत असतो. पण आता याला वेगळेच वळण मिळताना दिसत आहे.

*प्रेमात पळुन आलेल्या मुलीवर वेड्यासारखे फिरण्याची वेळ ; करमाळा पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलगी सुखरुप घरी*
ज्यांनी कधी गावात एकही निवडणूक लढवली नाही, जे कधी लोकांच्या संपर्कात नसतात, ज्यांच्या नावाची चर्चाही कुठे नसते असेही लोक आजकाल समाज माध्यमांमध्ये अमुक अमुक नावाची चर्चा म्हणून स्वतःच्याच बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी काही कार्यकर्त्यांना सांगत आहेत. मुळात अशा नेत्यांच्या मागे घरातीलही मत असेल का नाही हा प्रश्नचिन्ह आहे. पण गावातून लोकांची मागणी, नेत्यांच्या जवळचा कार्यकर्ता, नेत्याचा विश्वासू, समाजसेवक, भावी सभापती, भावी सदस्य अशा प्रकारचे स्वतःला पदव्या लावून ही लोक आपल्या बातम्या देऊन चर्चेत देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
*पठारावर चढाई करण्यासाठी गेल्यानंतर उमरड येथील एका युवकाचा मृत्यु ; बारामती येथील विद्यार्थी गेले होते ट्रेकिंगला
मुळात निवडणुका लढवण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. जो कोणी कधी चर्चेत नसला तरी त्यालाही अधिकार आहे, संपर्कात नसला त्यालाही अधिकार आहे, पण समाज माध्यमांमध्ये स्वतःची प्रसिद्धी करत असताना स्वतः उभारणार आहे असे सांगताना लोकांमधून चर्चा व लोकांची मागणी असे सांगणे चुकीचे आहे. यामुळे जे स्वतःची योग्यता नसतानाही अशा बातम्या लाऊन घेत असतील अशांसोबत जे अशा बातम्या लावतात त्यांची ही विश्वासार्हता यामुळे धोक्यात आली आहे. अशा हौशी, नौशी, गौशी,लोकांसाठी समाज माध्यमांनी ही काहीतरी तारतम्य बाळगणे गरजेचे आहे.