शासन आणि समाज यांच्यातील दुवा म्हणून आशा वर्कर काम करतात
करमाळा समाचार
आशा वर्कर यांचे मानधन वाढवून प्रशिक्षणासह स्टेशनरी आणि स्वतःच्या बचावासाठी सॅनिटायझर किट दिली पाहिजे. शासनाला काम करण्यासाठी आशा वर्कर ची गरज आहे. परंतु त्यांना आर्थिक मानधन देण्याऐवजी पूर्ण पगार दिला तर त्यांचेही जीवनमान उंचावले जाईल शासनाने आशा वर्कर म्हणून काम करणाऱ्या राज्यातील महिलांची कमी मानधन देऊन आर्थिक पिळवणूक नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे असे राजाभाऊ कदम म्हणाले.

ग्रामीण भागामध्ये आशा वर्कर ह्या अतिशय तुटपुंजा मानधना मध्ये आरोग्य सेवा देण्याचे काम करतात आणि आरोग्य सेवेला पूरक असे काम करतात म्हणून यांचे कार्य अतिशय महत्वाचे आहे शासनाने या आशा वर्कर ला शासकीय सेवेत सामावून घेऊन त्यांना जर कायम केले तर या आशा वर्कर ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याच्या सेवा घरोघर देऊन ग्रामीण जनतेचे आरोग्यमय जीवन उंचावतील अशी आशा आहे असे मत किसन कांबळे तालुका अध्यक्ष मागासवर्गीय शिक्षक संघटना करमाळा शाखा यांनी व्यक्त केले.

प्राथमिक शिक्षकांनी समाजाकरीता केलेले योगदान समाजाला दिशादर्शक असते त्याच बरोबर समाजातील सर्व घटकांसाठी काहीना काही करण्याची जी भावना आहे ती वाखानण्याजोगी आहे असे मत जेऊरवाडी येथील सरपंच अण्णासाहेब निमगिरे यांनी व्यक्त केले.
ग्रामीण भागातील गावोगावी असलेल्या आशा वर्कर या आरोग्याच्या मूलभूत सोयीसुविधा प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य अतिशय चोखपणे बजावत आहेत. त्यांच्या कार्याला तोड नाही याची जाणीव गावातील सर्व जाणकार मंडळींना आहे असे मत राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त संजयकुमार राजेघोरपडे ,भारत हायस्कूल ज्युनिअर कॉलेज जेऊर यांनी व्यक्त केले.
करमाळा पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक आणि शिक्षिका यांच्या वतीने सध्याचा कोरोनाच्या काळात करमाळा तालुक्यातील कोरोणा रुग्णांच्या सोयीसाठी स्वेच्छेने सुमारे नऊ लाखांचा निधी जमा केला होता. या जमलेल्या निधीतून करमाळा तहसीलदार यांना सुमारे सात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सप्रेम भेट देण्यात आले तर उर्वरित राहिलेल्या निधीतून करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात वाडीवस्तीवर कार्यरत असलेल्या आशा वर्कर यांना एक कीट देण्यात आले आहे.
त्याचाच भाग म्हणून जेऊर वाडी येथील आशा वर्कर वनिता ताई निमगिरे यांनाही किट देण्यात आले.
हे कीट देताना एक छोटेखानी घरगुती समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गावचे सरपंच अण्णासाहेब निमगिरे यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून राजाभाऊ कदम संस्थापक अध्यक्ष बहुजन संघर्ष सेना आणि प्राध्यापक संजय जी घोरपडे सर भारत हायस्कूल जेऊर हे उपस्थित होते.
अखिल भारतीय जय महाराष्ट्र स्वयंमसेवी संस्थेचे करमाळा तालुका अध्यक्ष दिनेशकुमार देवकर, केम हे ही कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि नियोजन किसन कांबळे तालुका अध्यक्ष मागासवर्गीय शिक्षक संघटना करमाळा तालुका शाखा यांनी केले होते.