करमाळाराजकीयसोलापूर जिल्हासोलापूर शहर

जगताप गट फोडण्याचा आणि चोरण्याचा प्रयत्न ? ; कार्यकर्त्याचा रेटा नेत्याचा धक्का

करमाळा समाचार 

तालुक्यातील जगताप गटाचे नेते मा. आ. जयवंतराव जगताप यांनी नुकतेच आपण विधानसभा लढवणार असल्याचे जाहीर केले. मागील निवडणुकीत त्यांनी विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला होता. त्यांच्या सहकार्यामुळे शिंदे यांना आमदारकी मिळवण्यास सहकार्य झाले होते. पण आता तेच माजी आमदार जगताप शिंदेंना सोडचिट्टी देण्याचा निर्णय घेतलेला दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्यासमोरच उघडपणे आपली उमेदवारी जाहीर करून टाकली. यामागे कार्यकर्त्यांचा रेटा असल्याचे सांगितले जात आहे.

मागील विधानसभा निवडणुकीनंतर थोड्या दिवसातच जगताप गटातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. कार्यकर्त्यांची कामे होत नव्हती, तर जगताप गटाकडून सुचवलेल्या कामांना कचऱ्याची टोपली दाखवली जात होती, पक्षातील कार्यकर्त्यांना जवळ करण्यासाठी त्यांना आमिष दिले जात होते. तर जगताप गट फोडण्याचा व चोरण्याचा प्रयत्न झाला असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनीच थेट नेत्याला आपण आता वेगळी भूमिका घ्यायला हवी असे सुचवले. त्यांच्या रेटानंतर आता नेतेही उघडपणे वेगळी भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.

politics

माजी आमदार जगताप यांनी घेतलेल्या या भूमिकेचा मोठा धक्का शिंदे गटाला बसू शकतो. मागील निवडणुकीत श्री. जगताप यांच्यामुळे शिंदे यांना मोठा आधार मिळाला होता. परंतु यंदाच्या निवडणुकीत स्वतः उभारणे किंवा दुसऱ्या गटाला पाठिंबा देणे हे मात्र शिंदे गटाला धोक्याचे ठरू शकते. कधी कधी जगताप हे मिश्किल पद्धतीने बोलून जातात पण त्यामागे बरच काही दडलेलं असतं यंदाही तसेच काही दडलेलं आहे का तीही मिश्किल टिप्पणी होती येणारा काळच ठरवेल. पण जर जगताप यांनी शिंदे यांच्यापासून फारकत घेतली तर हा मोठा धक्का ठरू शकेल.

तालुक्याच्या राजकारणात जगताप गटाला कायमच महत्त्वाचे स्थान राहिले आहे. स्व. नामदेवरावजी जगताप यांच्यापासून ते आजतागायत जगतापांकडे सत्ता असो किंवा नसो जगतापांची तालुक्यात प्रतिष्ठा व सन्मान कायमच राहिला आहे. त्यांच्या शब्दाला लोकांमधून प्रचंड प्रतिसाद मिळतो याची प्रचिती मागील निवडणुकीत त्यांनी दाखवून दिलेले आहे. नुकतेच बाजार समिती निवडणुकांमध्ये जगतापांना मिळालेला एकहाती विजय हा गटाला उभारी देणारा ठरला आहे. येणाऱ्या काळात त्यांनी विधानसभा लढवली तर वावगे वाटणार नाही.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE