करमाळा तालुक्यात जप्त केलेल्या वाळुचा लिलाव ; १९ जानेवारी पर्यत अर्ज करण्याची मुदत
करमाळा समाचार
करमाळा तहसील आवारात 50 ब्रास वाळू व शासकीय रेस्ट हाऊस कात्रज तालुका करमाळा येथे 55 ब्रास वाळू असा एकूण 105 ब्रास वाळू जप्त केलेल्या वाळू साठेचा करण्यास प्रांताधिकारी यांनी मंजुरी दिली आहे. तरी दिनांक 20 रोजी सकाळी 11 वाजता वाळूचा लिलाव तहसीलदार कक्षात होणार असल्याची माहिती तहसीलदार समीर माने यांनी दिली आहे.

मागील अनेक दिवसांमध्ये तहसील कार्यालयाकडून छापेमारी करून मोठ्या प्रमाणात वाळू साठा जप्त करण्यात आला होता. त्या वाळूसाठ्याच्या आता निलाव करण्यात येणार असल्याचे बाबत माहिती तहसील कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. त्यासाठी 19 जानेवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत लेखी स्वरूपात अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी 20 जानेवारीला सकाळी 11 वाजता तहसीलदार समीर माने यांच्या कक्षात या चा लिलाव करण्यात येणार आहे.

निलावा 105 बाळुची रक्कम तीन लाख 88 हजार पाचशे रुपये एवढी ठरवण्यात आली आहे.