रस्त्याची दुरावस्था ; ग्रामस्थ निवडणुकांवर बहिष्कार घालण्याच्या तयारीत
उमरड (नंदकिशोर वलटे) –
करमाळा तालुक्यातील अंजनडोह ते उमरड हा रहदारीचा रस्ता प्रवासा योग्य राहिला नाही. या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. अनेक दिवसांपासून या रस्त्यासाठी डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे मात्र रस्ता काही दुरुस्त होत नाही. या रस्त्याने करमाळा ते वाशिंबे ही बस सेवा दोन तासाला सुरू असते येथून अनेक विध्यार्थी वीट, करमाळा या ठिकाणी शिक्षणासाठी ये-जा करत असतात तसेच दूध उत्पादक सुद्धा या रस्त्याचा वापर करत आहेत.

सर्वांसाठी आवश्यक असणारा हा रस्ता प्रशासनाने लवकरात लवकर दुरुस्त करावा. सद्या पावसाचे दिवस असल्याने या रस्त्यावर चिखल, खड्डे व पाणी साचून रहात आहे. त्यामुळे पायी चालत जाणे सुद्धा अवघड झाले आहे. शासन दरबारी वारंवार रस्त्याची मागणी केली असता ती पूर्ण होत नाही. केवळ चार किलमीटरचा हा रस्ता वाहतूक योग्य व्हावा म्हणून अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. या रस्त्याने जाणाऱ्या लोकांची खूप मोठी गैरसोय होत आहे.

” अंजनडोह ते उमरड या खडीकरणाच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे लोकप्रतिनिधीनी याकामी लक्ष घालून रस्ता दुरुस्त करावा अन्यथा या पुढील मतदानावर आम्ही बहिष्कार घालणार”
-प्रदीप कोठावळे(उमरड)