करमाळ्यात ४९ जनावरे दाटीने कोंडून घेऊन जाणाऱ्या दोघांचा जामीन मंजूर
करमाळा समाचार
४९ जनावरे कोंडुन कत्तल करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली होती त्या दोघांना पंधरा हजार रुपयांच्या जामिनावर सोडण्यात आले आहे. संबंधित संशयीतांच्या वतीने एडवोकेट अमर शिंगाडे यांनी काम पाहिले.

26 डिसेंबर 2023 रोजी मौलालीचामाळ करमाळा येथे पत्रा शेडमध्ये कत्तल करण्यासाठी गोवंश जातीचे जनावरे घेऊन जाणार असल्याचे पोलिसांना गोपीनीय मिळालेल्या माहितीनुसार समजले त्या अनुषंगाने पोलिसांनी सायंकाळी सहा वाजले च्या दरम्यान घटनास्थळी जाऊन संबंधित संशयीत आरोपीवरती प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 कलम कायद्यानुसार कारवाई केली.

याकारवाई मध्ये एकूण 49 जनावरे गर्दीने उभे करून कोंडून त्यात चारा पाण्याची सोय न करता औषधाची सोय न करता केवळ कत्तल करण्यासाठी त्यांना निर्दयीपणे वागणूक देणाऱ्या संशयीत आरोपी शाहरुख कुरेशी व आलिम कुरेशी दोघे रा. मौलाली माळ यांच्या विरोधात विरुद्ध करमाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. संबंधित आरोपीने वकिलामार्फत करमाळा कोर्टात धाव घेतली. संबंधित आरोपींच्या वकिलांनी संबंधित कलमांतर्गत युक्तिवाद सादर करून प्रत्येकी १५ हजाराच्या जामीनावरती जामीन मंजूर केला.