करमाळासोलापूर जिल्हा

बाल वारकऱ्यांनी अनुभवला रिंगण सोहळा ; माऊलींच्या जयघोषाने परिसरात उत्साह

जिंती – दिलीप दंगाणे

कात्रज कृष्णाई इंटरनॅशनल स्कूल कात्रज कृष्णाई नगर येथे आज ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा जयघोष करीत टाळ मृदंगाच्या गजरात सर्व विद्यार्थी व कृष्णाई स्कूलचा सर्व स्टाफ यांनी मिळून कात्रज भिगवन रोड पर्यंत दिंडीचे आयोजन केले. या दिंडी सोहळ्यात चिमुकल्या मुला मुलींनी वारकरी यांच्या वेशभूषा मध्ये कष्टा साडी घालून मुलींनी डोक्यावरती तुळशी वृंदावन घेतले होते.

चिमुकल्या मुलांनी कुर्ता पायजमा नेहरू शर्ट डोक्याला टोपी कपाळी गंध गळ्यात टाळ हातात भगवी झेंडे अशी संतांची वेशभूषा करत पाणी आडवा पाणी जिरवा झाडे लावा झाडे जगवा मुलगी वाचवा देश वाचवा अशा घोषणा देत कृष्णाई नगर दुमदुमून गेले . हा चिमुकल्यांचा दिंडी सोहळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेच्या मैदानामध्ये रिंगण सोहळा तसेच फुगडी खेळत विद्यार्थ्यांनी व पालकांनी या दिंडी सोहळ्याचा आनंद लुटला. हा सोहळा साजरा करण्यासाठी कृष्णाई इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक श्री तानाजी करचे, प्रिन्सिपल सौ स्मिता पाटील,  अमरजीत सर सर्व कृष्णाई इंटरनॅशनल स्कूल स्टाफ यांनी परिश्रम घेतले.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE