भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत आक्षेपार्ह गाणे ; कारवाईची मागणी
करमाळा समाचार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत आक्षेपार्ह गाणे तयार करून युट्युब वर टाकल्याप्रकरणी संबंधितांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावी अशी मागणी वंचित बहुजन युवा गाडीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन करमाळा उपविभागीय अधिकारी विशाल हिरे यांना देण्यात आले आहे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत अवमान करण्यात आलेला व्हिडिओ हा अलोक उपाध्याय याने टाकलेला आहे. उपाध्याय याने महापुरुषाचा अवमान तसेच सामाजिक स्वास्थ बिघडवणे आणि दंगली घडवणे चा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी त्याच्यावर ॲट्रॉसिटी व इतर कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत. सदरचे गुन्हे दखलपात्र आहेत.

त्यामुळे त्याला तातडीने अटक व्हावी आणि तात्काळ जामीन मिळू नये याकरिता दंगलीचे गुन्हे दाखल करण्यासाठी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे असा निवेदनात उल्लेख केला आहे.
सदरच्या निवेदनावर वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव नितीन सरवदे व जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी साहेबराव वाघमारे यांच्यासह गणेश कांबळे, महादेव पोळ, सौरव विटकर, आदित्य गायकवाड, नवनाथ देवकर , अक्षय गुंजाळ, मंगेश समिंदर, अजय कांबळे, किरण मोरे आदींच्या सह्या आहेत.