माजी आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते रस्त्यांचे भुमिपुजन सोहळा
प्रतिनिधी जिंती
तालुक्याचे माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांचे शुभहस्ते व जिल्हा परिषदेच्या सदस्या सवितादेवी राजेभोसले यांच्या अध्यक्षतेखाली व सभापती अतुल (भाऊ) पाटील उपसभापती केशरताई चौधरी, सौ.मंदाकिनी (ताई)लकडे एस्.जे.नाईकवडी उपअभियंता करमाळा यांचे सन्मानिय उपस्थितीत रस्ते कामाचे भूमिपूजन सोहळा होणार आहे.

शनिवार दि.12 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 3 पासून संध्या 6:30 वाजेपर्यंत मांजरगाव ते कोर्टी रस्ता, राजुरी ते मांजरगाव रस्ता, हिंगणी ते केत्तूर रस्ता,दिवेगव्हाण ते कुंभारगाव रस्ता, कुंभारगाव ते हिंगणी रस्ता, कुंभारगाव ते करपडी हद्द रस्ता, भिलारवाडी ते जिंती रस्ता, कात्रज ते जिंती रस्ता कार्यक्रम सोहळा संपन्न होणार आहे.