प्रमुख गटांसह भाजपा मैदानात ; बाजार समीती निवडणूकीत 161 अर्ज
करमाळा :
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेर दिवशी ८५ अर्ज दाखल झाल्या तर एकुण १६१ अर्ज दाखल झाले आहेत. तर दोन व्यापारी व एक हमाल अशा तीन जागा अविरोध निघण्याच्या मार्गावर आहेत. सदर निवडणुकीत जगताप, बागल, पाटील व शिंदे गटासह भाजपाने उमेदवारी भरल्याने चुरस निर्माण झाली आहे.

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आबासाहेब गावडे हे काम पाहत आहेत. करमाळा तहसील कार्यालय परिसरात सहकारी संस्था निबंधक कार्यालयात ही निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. १८ जागांसाठी ही निवडणूक आहे. या अर्जाची सोमवारी सकाळी पंचायत समीती हॉल तहसिल परिसर येथे होणार आहे. .
७ जागांसाठी सहकारी संस्था सर्वसाधारण ५७, २ जागांसाठी सहकारी संस्था महिला राखीव १५, १ जागेसाठी सहकारी संस्था इतर मागास वर्ग १०, १ जागेसाठी सहकारी संस्था विमुक्त जाती जमाती ९, २ जागेसाठी ग्रामंचायत सर्वसाधारण ४५, १ जागेसाठी ग्रामपंचायत अनु. जाती जमाती १०, १ जागेसाठी आर्थीक दुर्बल घटक ११, व्यापारी २ व हमाल तोलार एकाच सदस्याचे दोन अर्ज दाखल आहेत. व्यापारी मनोज पितळे व परेश दोशी तर वालचंद रोडगे हमाल गटातुन अर्ज बाकी आहेत.
